“शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा! तातडीने शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करा – आ. आशुतोष काळे”

“शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा! तातडीने शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करा – आ. आशुतोष काळे”

“Stop the farmers’ losses! Immediately start purchasing maize at the government-guaranteed price – MLA Ashutosh Kale”

कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांची तणावाची अवस्था

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed21 Jan 19.10Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: मका उत्पादन वर्षभरातील शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक असून, यंदा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात मका पिकवला आहे.परंतु शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु नझाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत पडावे लागत आहे.

मका उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून शासकीय खरेदीची प्रतीक्षा केली आहे; तरीही कोपरगाव तालुक्यात एकमेव शासकीय खरेदी केंद्र बहादराबाद येथे असून, अद्याप मका खरेदी सुरु झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात मका विकावी लागत आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर भर देत आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की,  तातडीने शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरु करावी,खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सहजपणे मका विकता येईल,वाढलेला उत्पादन खर्च, खत व मजुरी खर्च लक्षात घेऊन योग्य दर निश्चित करावा असे नमूद केले आहे.

पत्रात आ. काळे यांनी स्पष्ट केले आहे की, मका हे पशुखाद्य, उद्योग व अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर मागणीत आहे. मात्र खरेदी न सुरु झाल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दरात मका विकत घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासकीय हमीभाव न मिळाल्यास, शेतकऱ्यांना कर्ज फेडणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होईल.

आ. काळे यांनी थेट आव्हान केले आहे की, शासनाने तातडीने व्यवस्था करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अन्यथा या पीक वर्षाचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही.

Leave a Reply

You cannot copy content of this page