“कोपरगावला मिळाली नव्या विकासाची दिशा;फडणवीस यांनी दिला सकारात्मक संकेत”

“कोपरगावला मिळाली नव्या विकासाची दिशा;फडणवीस यांनी दिला सकारात्मक संकेत”

Kopargaon gets new development direction; Fadnavis gives positive signal”

स्मार्ट सिटी प्रकल्प, पाणीपुरवठा, रस्ते विकास व नागरी सुविधा यांवर ऊहापोह 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb12 Thu.17.40 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची युवानेते विवेक कोल्हे यांनी भेट घेतली. या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्प, पाणीपुरवठा, रस्ते विकास व नागरी सुविधा यांसह शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. विकासकामांना गती देण्यासाठी शासन व स्थानिक पातळीवर समन्वय अधिक बळकट करण्याचे आश्वासन मिळाले. असल्याचे समजते.

धोत्रे, नाथगंगा, बापतरे, पुरणगाव यासह सुमारे ५००० एकर क्षेत्रावर २०१९ पासून प्रलंबित स्मार्ट सिटी प्रकल्पासह शेतकऱ्यांच्या चार प्रमुख मागण्या यावर सकारात्मक निर्णय झाल्यास तातडीने करारनाम्याची प्रक्रिया सुरू होऊन विकासकामांना गती मिळेल, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी पाणीपुरवठा योजना, जलसिंचन प्रकल्प, रस्ते विकास, नागरी सुविधा आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांवरही मुद्देसूद चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपरगावच्या विकासात्मक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत मार्गदर्शन केले व स्थानिक-सामूहिक समन्वय वाढवून प्रगतीला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

विवेक कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही भेट कोपरगावच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासकामांना गती मिळेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page