“इंदिरापथ होणार झकास!” — नगराध्यक्ष पराग संधान यांचा विकासाचा श्रीगणेशा 

“इंदिरापथ होणार झकास!” — नगराध्यक्ष पराग संधान यांचा विकासाचा श्रीगणेशा 

“Indirapath will be a hit!” — Mayor Parag Sandhan’s message of development

प्रभाग १० मधील रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणास नव्याने गती; दर्जेदार कामासाठी प्रत्यक्ष पाहणी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb13 Fir.19.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील डॉक्टर जवेरी हॉस्पिटल ते नरोडे यांच्या घरापर्यंत (इंदिरापथ) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास नगराध्यक्ष पराग संधान यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळाली आहे. रखडलेल्या कामाला गती देत त्यांनी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून दर्जा आणि गुणवत्ता यावर ठाम भूमिका घेत विकासाचा श्रीगणेशा  असल्याचे स्पष्ट केले.

अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. खड्डे, उडणारी धूळ आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्ग यांना विशेष त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

कामाची गुणवत्ता अबाधित राहावी यासाठी नगराध्यक्ष संधान यांनी डांबराची जाडी, पाणी निचऱ्याची व्यवस्था, रस्त्याची मजबुती आणि कामाचा वेग यांची सखोल पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत, “नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. काम टिकाऊ आणि दर्जेदार व्हावे, हीच आमची प्राथमिकता आहे,” असे ठामपणे सांगितले.

रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल व सुरक्षित, सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक रवी कथले, नगरसेविका विजया देवकर, कालू आप्पा आव्हाड, विनोद राक्षे, संदीप देवकर, मुख्याधिकारी सुहास जगताप, बांधकाम अधिकारी मोटे, निलेश बंब, माहूरकर सर, माजी नगरसेवक संजय कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page