निळवंडेचे पाणी जिरायती बांधावर; आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश

निळवंडेचे पाणी जिरायती बांधावर; आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश

Nilwande water on the irrigation dam; Ashutosh Kalen’s pursuit is successful

वेस–सोयगाव, काकडीसह ११ गावांतील शेतकऱ्यांकडून सत्कार; वितरिका क्र. ०३ ची चाचणी यशस्वी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb13 Fir.19.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: मतदारसंघातील जिरायती ११ गावांची अनेक दशकांची प्रतीक्षा अखेर संपली असून निळवंडे कालव्याचे पाणी वितरिका क्र. ०३ द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याने वेस–सोयगाव व काकडी येथील शेतकऱ्यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर जुने ओढे-नाले दुरुस्त करून व आवश्यक ठिकाणी डोंगळे टाकून पाणी जिरायती भागात वळविण्यात आले. त्यामुळे गावातील तळे, बंधारे आणि साठवण तलाव भरले असून नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. टँकरवर अवलंबून असलेल्या गावांना आता दिलासा मिळाला आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत वितरिकांच्या कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर आमदार काळे यांनी कामांवर सातत्याने लक्ष ठेवले. वितरिका क्र. ०३ चे काम पूर्ण होऊन झालेल्या चाचणीत पाणी पूर्ण क्षमतेने कोणताही अडथळा न येता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. वितरिका क्र. ०४ चे कामही प्रगतीपथावर असून ते लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.

“तीन पिढ्यांची प्रतीक्षा संपली. हा दिवस पाहायला मिळणे आमच्यासाठी ऐतिहासिक आहे,” अशी भावना शेतकरी चंद्रकांत पाडेकर यांनी व्यक्त केली. या यशामुळे जिरायती परिसर सुजलाम-सुफलाम होण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page