उलटा चोर कोतवाल को डाटे; सुखशांतीनगर भूमिपूजनावरून काळे गटावर कोल्हे गटाचा पलटवार
Reverse the thief Kotwal Ko Date; Kolhe group counterattacks Kale group on Sukhshantinagar Bhoomi Pujan
“उपस्थित राहून फोटोसेशन, दुसऱ्या दिवशी ‘निमंत्रण नव्हते’”; रणशूर यांचा पुराव्यानिशी प्रतिवाद
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb16 Mon.19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: सुखशांतीनगरमधील संरक्षक भिंतींच्या कामाचे भूमिपूजन रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.काळे गटाच्या नगरसेविका स्मिता साबळे आणि त्यांचे पती शैलेश साबळेही कार्यक्रमात दिसले, असा दावा कोल्हे गटाने छायाचित्रे व व्हिडिओसह केला.
भूमिपूजनानंतर दुसऱ्या दिवशी “आम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते” असा आरोप काळे गटाकडून आला. मात्र, रणशूर यांनी या आरोपांचे खंडन करत पुरावे सार्वजनिक केले. “नगरसेवकांना माहिती नव्हती, तर फोटोसेशन कसे झाले? नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन का केले? निमंत्रण नव्हते, तर सौ. साबळे कुदळ टाकतानाचे फोटो कसे उपलब्ध आहेत?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
रणशूर यांच्या मते, काम सुरू होणार असल्याची कल्पना काळे गटाला होती. तरीही दुसऱ्या दिवशी पालिकेत जाऊन ‘नाटकी बतावणी’ केली गेली. “जनतेने नाकारलेल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना खोटे आरोप करण्यास भाग पाडले,” असेही त्यांनी सांगितले.
भूमिपूजनानंतर सौ. साबळे यांनी रेणुका कोल्हे यांना घरी पाहुणचारासाठी निमंत्रित केले, असे प्रत्यक्षदर्शी म्हणाले. रणशूर यांनी म्हटले, “आ. काळे यांनी विनाकारण विकासाला विरोध करण्यासाठी दबाव दिला असावा. विकासापेक्षा राजकारणालाच प्राधान्य दिले जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
भूमिपूजनाच्या छायाचित्रांमध्ये नगरसेविका स्मिता साबळे कुदळ मारताना दिसत असल्याने काळे गटाच्या आरोपांना कोल्हे गटाने पुराव्यानिशी उत्तर दिले आहे. स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी अधिकच पेटली आहे.
Post Views:
2





