आशुतोष काळे यांचा दमदार पाठपुरावा; कोपरगाव ग्रामीण भागात ७० लाखांचा ‘फिटनेस’ साहित्य!
Ashutosh Kale’s strong follow-up; ‘Fitness’ materials worth 70 lakhs in Kopargaon rural area!
१० गावांत अत्याधुनिक जिम साहित्याला मंजुरी; शासकीय भरतीसाठी तरुणांना नवी ताकद
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb17 Tue.19.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : स्पर्धेच्या युगात ग्रामीण युवकांच्या सशक्त शरीरयष्टीसाठी निर्णायक पाऊल उचलत आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. कोपरगाव मतदारसंघातील १० गावांना व्यायामशाळांसाठी प्रत्येकी ७ लाख रुपये याप्रमाणे तब्बल ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पोलीस, लष्कर, अग्निशमन दल तसेच विविध शासकीय भरती प्रक्रियेत शारीरिक तंदुरुस्तीच्या निकषांमुळे अनेक ग्रामीण तरुणांच्या संधी हुकतात. शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक व्यायाम साधनांच्या तोडीस तोड सुविधा ग्रामीण भागातही मिळाव्यात, या उद्देशातून काळे यांनी हा प्रस्ताव शासनदरबारी लावून धरला होता.
मंजूर निधीतून वारी, मायगाव देवी, डाऊच खुर्द, कारवाडी, भोजडे, ब्राम्हणगाव, काकडी, डाऊच बु., आपेगाव आणि मढी बु. या गावांमध्ये आधुनिक जिम साहित्य उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नियमित सरावातून शारीरिक क्षमता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे.
“ग्रामीण तरुणांनाही स्पर्धात्मक युगात सक्षम बनवणे हेच ध्येय आहे. आधुनिक सुविधा मिळाल्यास आपल्या मुलांनाही पोलीस, लष्करासारख्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळतील,” असे आमदार काळे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात ‘फिटनेस क्रांती’ची नांदी ठरणारा हा निधी युवकांच्या स्वप्नांना नवी उभारी देणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Post Views:
2





