राष्ट्रवादीचा दुसरा राजकीय स्फोट; सोनल अजमेरे यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह
NCP’s second political explosion; Question mark on Sonal Ajmere’s eligibility
नागरिकांमध्ये खळबळ; न्यायालयात कारवाईची शक्यता
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb25 Wed.18.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:शहरातील राजकारण पुन्हा एकदा खळबळीत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या स्वीकृत नगरसेविका सोनल अमोल अजमेरे यांच्या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय अशोक नागरे यांनी औपचारिक हरकत घेतली असून त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
शहरातील राजकारणात सलग तिसऱ्या दिवशी नवा राजकीय स्फोट झाला असून सत्ताधारी गटातील पदाधिकाऱ्यांच्या पात्रतेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट सवाल उपस्थित केले आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राष्ट्रवादीने खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी “आणखी पाच-सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत विशेष कारवाई केली जाणार” असा इशारा देण्यात आला होता.त्या इशाऱ्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच राष्ट्रवादीने स्वीकृत नगरसेविका सोनल अमोल अजमेरे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रवादीचे विजय अशोक नागरे यांनी औपचारिक हरकत घेतली असून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
खोट्या प्रतिज्ञापत्राचा आरोप
बुधवारी (२५) रोजी सायंकाळी गौतम बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे विजय अशोक नागरे यांच्या वतीने ॲड . मुन्ना सय्यद यांनी सांगितले की, स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या पात्रता निकषांबाबत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. नामनिर्देशन पत्रात स्वतःला संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे सदस्य असल्याचे नमूद करून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
मात्र माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित संस्थेच्या घटनेत सदस्य होण्यासाठी विशिष्ट अटी असल्याचे समोर आले आहे. त्या अटी उमेदवारास लागू होतात का, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे.
धर्मदाय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार २०१७ पासून संस्थेकडून कोणताही ‘चेंज रिपोर्ट’ सादर करण्यात आलेला नसल्याचेही नमूद करण्यात आले. त्यामुळे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा दावा करण्यात आला.
“ही फक्त सुरुवात” — शहरात चर्चेला उधाण
यापूर्वी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करताना राष्ट्रवादीकडून आणखी काही नगरसेवकांच्या पात्रतेबाबत विशेष पावले उचलली जातील, असा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आता अजमेरे यांच्या पदावर हरकत घेण्यात आल्याने “पुढे आणखी काय उघड होणार?” याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय वर्तुळात अनेकांचे “धाबे दणाणले” असल्याची कुजबुज सुरू असून सत्ताधारी गटावर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे. भाजपाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी सलग अक्षयपामुळे आगामी काही दिवसात आणखी धक्कादायक घडामोडी होऊ शकतात अशी चर्चा वर्तवली जात आहे
Post Views:
5





