कोकमठाण येथे आज महसूल समाधान शिबिर

कोकमठाण येथे आज महसूल समाधान शिबिर

Revenue satisfaction camp today at Kokamthan

आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने आयोजन; नागरिकांच्या शासकीय कामांचे एकाच ठिकाणी निराकरण

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 6 Fir.18.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: तालुक्यातील कोकमठाण येथे राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत आज (दि.७) एक दिवसीय महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने रामदासी महाराज आश्रम येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असून उप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात महसूल, पंचायत समिती, कृषी, भूमी अभिलेख, महिला व बाल विकास तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे मार्गदर्शन व निराकरण करणार आहेत. फेरफार कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती, जिवंत ७/१२ मोहीम, विविध दाखले, सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज यांसह शेतकऱ्यांसाठी अँग्रीस्टॅक नोंदणी, पीएम किसान व महाडीबीटी योजना तसेच ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भातही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

कोकमठाण परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page