गुढीपाडव्याच्या सुरेल पहाटेने कोपरगाव दुमदुमले!
Kopargaon resounded with the melodious dawn of Gudi Padwa!
ज्येष्ठ नागरिक मंचचा अनोखा उपक्रम; संगीत, संस्कृती आणि सामाजिक संदेशांची संगममेळा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 19 Thu.16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : गुढीपाडव्याच्या मंगलमय पहाटे कोपरगाव शहर सुरेल स्वरांनी न्हाऊन निघाले. ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने आयोजित ‘पहाट पाडवा’ निमित्त शारदा संगीत विद्यालय चे मालक केतन कुलकर्णी व सौ कुलकर्णी यांच्या तबला व हार्मोनियम च्या सहकार्याने रंगलेल्या संगीत कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सुमधुर गायन सादर करत नववर्षाचे स्वागत उत्साहात केले.
कार्यक्रमात प्राध्यापक घैसास सर यांनी साई गीत सादर केले सौ. सुधाभाभी ठोळे यांनी गोवंश संवर्धन व गोहत्या या विषयावर भावस्पर्शी गीत सादर करत सामाजिक जाणीवा जागृत केल्या. बालकलाकारांनी ‘खंडोबाच्या लग्नात बानु नवरी नटली’ व ‘आमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीतांनी रसिकांची मनं जिंकली, तर ज्येष्ठ महिलांनी ‘चांदणं चांदणं झाली रात’ सादर करत वातावरण भारावून टाकले. झी मराठी स्टार गौरी पगारे हिनेही आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमाला चार चाँद लावले.
यावेळी विवेक कोल्हे व सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते पारंपरिक गुढी उभारून पूजा करण्यात आली. कार्यक्रमात ज्येष्ठांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष नागरिक म्हणजे अध्यक्ष विजय बंब, नगराध्यक्ष पराग संधान, महाराष्ट्र राज्य संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ. सुहासिनी कोयटे, उद्योजक कैलास शेठ ठोळे, सौ. सुधाभाभी ठोळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्यासह विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर महिलांनी फेटे बांधून काढलेल्या दुचाकी रॅलीने शहराचे लक्ष वेधले. त्यानंतर गांधी चौक येथे ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक परंपरा, सामाजिक भान आणि एकोप्याचा सुंदर संदेश देणारा हा उपक्रम कोपरगावकरांसाठी संस्मरणीय ठरला.
चौकट
पहाट पाडव्याला स्मृतींचा भावस्पर्शी उजाळा! स्व. भागचंद भाऊ ठोळे यांना अभिवादन;
कार्याचा वारसा जपण्याचा निर्धार
गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी पहाट पाडव्याची सुरुवात,ज्येष्ठ नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष स्व. भागचंद भाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरणाने झाली.मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून
भावपूर्ण अभिवादन व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.त्यांच्या कार्याचा जागर ठेवत विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त झाला.
Post Views:
12







