“गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच खरी ताकद; आदिवासी मुलांना मानाचे स्थान मिळालेच पाहिजे!” — सुमित कोल्हे
“Quality education is the true strength; tribal children must secure a place of dignity!” — Sumit Kolhe
“आदिवासी विद्यार्थ्यांची झेप डिजिटल आकाशात; संजीवनीचा ‘गाव ते ग्लोबल’ निर्धार!”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 20Fir.12.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली झाली पाहिजेत आणि त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळवले पाहिजे,” असा ठाम संदेश देत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी शिक्षण क्षेत्रातील असमानतेवर थेट बोट ठेवले.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर ते कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे पुन्हा एकदा टाकळी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळेने सिद्ध करून दाखवले आहे. संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेने राजूर (ता. अकोले) प्रकल्पस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
राजूर (ता. अकोले) प्रकल्पस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. संगमनेर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत आदिवासी विद्यार्थ्यांनी संगणकीय विचारसरणी, तर्कशक्ती आणि स्क्रॅच कोडिंगच्या माध्यमातून आपली क्षमता सिद्ध केली.
श्रद्धा रामदास पवार, ओंकार संतोष पवार आणि रोहित भाऊसाहेब पवार या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि जिद्द पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
शिक्षक धनेश गायकवाड आणि मुख्याध्यापिका मीरा जोशी यांनाही ‘कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत लॅपटॉप देऊन सन्मान करण्यात आला.
सुमित कोल्हे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “संजीवनी संस्था केवळ शिक्षण देत नाही, तर ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करते. डिजिटल युगात त्यांना सक्षम करणे हीच काळाची गरज आहे.”
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट
संजीवनीची ही कामगिरी केवळ एक यश नाही, तर संजीवनीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या नव्या वाटा खुल्या होत असून, डिजिटल युगात आदिवासी मुलांची ही झेप भविष्यातील बदलाची नांदी मानली जात आहे.आदिवासी समाजातील मुलांमध्ये आत्मविश्वासाची नवी पहाट उगवत असल्याचे चित्र आहे.
Post Views:
14





