क्लासेसचा बाजार, शिक्षणाचा बोजवारा! पालकांची लूट – विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

क्लासेसचा बाजार, शिक्षणाचा बोजवारा! पालकांची लूट – विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

The Commercialization of Coaching Classes: The Ruin of Education! Exploitation of Parents—Playing with Students’ Futures.

ओस पडणाऱ्या शाळा, बंद पडण्याच्या उंबरठ्यावर विद्यापीठे… आणि गल्लीबोळात फोफावलेला कोचिंगचा साम्राज्य – शिक्षण खातं झोपेत का?

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 2Thu.11.00 Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:आज शिक्षण क्षेत्रात एक विचित्र आणि धोकादायक वास्तव समोर येत आहे. एकीकडे नियमांच्या चौकटीत अडकलेल्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे अक्षरशः तग धरत आहेत; तर दुसरीकडे कोणत्याही नियंत्रणाशिवाय, कोणत्याही जबाबदारीशिवाय खाजगी क्लासेसचे जाळे शहरोशहर, गावोगावी पसरत आहे.हा केवळ व्यवसाय नाही – हा पांढरपेशीय लुटीचा उद्योग बनला आहे.क्लासेस म्हणजे शिक्षण नव्हे, ‘मार्केटिंग’चा खेळआजच्या खाजगी क्लासेसचे वास्तव पाहिले तर ते शिक्षणापेक्षा जाहिरातींवर चालतात.

शहरभर बॅनर, टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो, “100% निकाल”, “मर्यादित जागा”, “स्पेशल बॅच” अशा घोषणांनी पालक आणि विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढले जाते.पण प्रश्न असा – त्या टॉपर विद्यार्थ्यांची खरी मेहनत कोणाची? शाळेची की क्लासची?वास्तव हे आहे की हे विद्यार्थी आधीपासूनच हुशार असतात. क्लासेस त्यांच्या यशावर शिक्का मारून स्वतःची दुकानदारी वाढवतात.फीचा आकडा ऐकून डोळे पांढरे एका विषयासाठी ७,००० ते १२,००० रुपये सीईटीसाठी ७० दिवस – १२ ते १५ हजार रुपये,एका बॅचमध्ये ६०-७० विद्यार्थी हिशोब लावा,एका तासासाठी विद्यार्थ्यांकडून मिनिटाला २०-२५ रुपये उकळले जातात

ना कर, ना हिशेब, ना जबाबदारी ही उघडपणे चालणारी आर्थिक लूट नाही तर काय?शाळा-महाविद्यालयांवर नियमांचा डोंगर दुसरीकडे शाळा आणि महाविद्यालयांचे चित्र बघा: शिक्षकांची पात्रता तपासणी,विद्यापीठाचे नियंत्रण,सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्थाक्रीडा, सांस्कृतिक उपक्रम,लायब्ररी, प्रयोगशाळा, प्लेसमेंट विभाग हे सर्व सांभाळून वर्षाला ५ ते १० हजार रुपयांत शिक्षण दिलं जातं! तेही विनाअनुदानित शाळा असेल तर अन्यथा ५०० ते ६०० रुपये बाकी  सरकारची स्कॉलरशिप

पण तरीही पालकांचा विश्वास कुठे?क्लासेसवर!विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खच्चीकरण क्लासेसचे आणखी एक भयंकर परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःवरचा विश्वास संपवणे.“क्लासशिवाय काहीच होणार नाही” ही मानसिकता मुद्दाम तयार केली जाते.शाळेतील शिक्षक कमी लेखले जातात.विद्यार्थी अभ्यासासाठी नव्हे, तर भीतीपोटी क्लासला जातो. शिक्षणाचा व्यवसाय – ‘दान’ ते ‘धंदा’ पूर्वी शिक्षण म्हणजे समाजसेवा, राष्ट्रनिर्मिती. आज शिक्षण म्हणजे गुंतवणूक आणि परतावा.जुन्या नामांकित संस्था डबघाईला, सरकारी शाळा ओस पडलेल्या,महाविद्यालयांना विद्यार्थी नाहीत आणि दुसरीकडे क्लासेसचे साम्राज्य दिवसेंदिवस फुगत आहे.

सरकारची भूमिका संशयास्पद का?मोठा प्रश्न –शिक्षण खातं झोपलंय का?क्लासेससाठी परवाना नाही,फी नियंत्रण नाही,विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा नाही,सुविधा तपासणी नाहीशाळांवर मात्र नियमांचा मारा! ही दुटप्पी भूमिका का?

पालकांची मजबुरी की फॅशन?आज क्लास लावणे ही गरज कमी आणि फॅशन जास्त झाली आहे.“इतरांचा मुलगा जातो, आपलाही जावा”  या मानसिकतेतून हजारो रुपये खर्च होतात.पण निकालाची हमी कुठेच नाही.

धोक्याची घंटा – आत्महत्येपर्यंत जाणारी वेळअशाच वेगाने फी वाढत राहिली तर तो दिवस दूर नाही पालकांना क्लास फी भरण्यासाठी कर्ज, आणि पुढे टोकाची पावले उचलावी लागतील. ही केवळ शक्यता नाही  ही सुरू झालेली प्रक्रिया आहे.

आता काय करायला हवं? (रोखठोक मागण्या)

खाजगी क्लासेससाठी परवाना अनिवार्य करावा,फीवर सरकारी नियंत्रण आणावे विद्यार्थ्यांची कमाल संख्या निश्चित करावी,क्लासेसची वार्षिक ऑडिट तपासणी करावी,जाहिरातींवर नियम लागू करावेत,निकालाबाबत जबाबदारी निश्चित करावी

अंतिम सवाल,

शिक्षण वाचवायचं की बाजारात विकायचं?आज निर्णय घेतला नाही तर उद्या –शाळा बंद, महाविद्यालये रिकामी,आणि क्लासेसचं राज्य,हा केवळ लेख नाही –हा इशारा आहे.

शिक्षण वाचवा, लुट थांबवा!” स्कॉलरशिप शाळांना… विद्यार्थ्यांचा ओढा क्लासेसकडे! शिक्षण व्यवस्थेतील विसंगती उघडी,पालकांची लूट, विद्यार्थ्यांचा खच्चीकरण… आणि परिस्थिती एवढी गंभीर की राधाकृष्ण विखे पाटील यांनाही क्लासेसवर बोलावे लागले!सरकार दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्यानावाखाली हजारो कोटी रुपये शाळा आणि महाविद्यालयांना देते.उद्देश स्पष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारे शिक्षण मिळावे.

मात्र वास्तव उलट आहे.शाळांना पैसा… पण विद्यार्थी क्लासेसमध्ये! ही केवळ विसंगती नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील मोठा बिघाड आहे. शाळा सक्षम… तरीही विद्यार्थ्यांचा विश्वास क्लासेसवर, शाळा आणि महाविद्यालये नियमांच्या चौकटीत राहून शिक्षण देतात.पात्र शिक्षक,लायब्ररी,प्रयोगशाळा, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम,सुरक्षा व्यवस्था हे सर्व असूनही विद्यार्थी आणि पालक क्लासेसकडे धावत आहेत.

मग प्रश्न सरळ – सरकारचा कोट्यवधींचा निधी नेमका कोणासाठी? क्लास संस्कृतीचा विळखा  आत्मविश्वासावर घाला आज विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती पेरली जाते.“क्लासशिवाय काहीच होणार नाही!” यामुळे:शाळेतील शिक्षण कमी लेखले जाते.स्वतःच्या क्षमतेवर विश्वास कमी होतो.आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी मागे पडतो.अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास गमावल्यामुळे टोकाची पावले उचलल्याचेही समोर आले आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

क्लासेसचा उघड ‘धंदा’एका विषयासाठी हजारो रुपये,CET/NEET साठी अल्प कालावधीत लाखोंची कमाई,एका वर्गात ६०-७० विद्यार्थी, ना कर, ना नियंत्रण, ना जबाबदारी! टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो लावून जाहिरातबाजी,आणि पालकांची उघडपणे आर्थिक लूट.परिस्थिती एवढी बिघडली की मंत्रीही बोलले! या सर्व पार्श्वभूमीवर सर्वात गंभीर बाब म्हणजे,  जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतः या प्रश्नावर सार्वजनिकरित्या भाष्य करावे लागले.एका शैक्षणिक कार्यक्रमात त्यांनी क्लासेसच्या वाढत्या साम्राज्यावर थेट बोट ठेवत,पालकांची होत असलेली लूट आणि शिक्षण व्यवस्थेतील असमतोल उघड केला.प्रश्न इथेच निर्माण होतो – एक मंत्री, तेही पालकमंत्री, यांना जर या विषयावर बोलावे लागत असेल…तर परिस्थिती किती गंभीर झाली आहे? शाळा ओस पडल्या… क्लासेस फुलले आज चित्र स्पष्ट आहे:

शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थीअभावी त्रस्त,जुन्या शिक्षण संस्था डबघाईला,क्लासेस मात्र कोट्यवधींचा व्यवसाय करत फोफावत आहेत,शतकानुशतके विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या संस्था आज अस्तित्वासाठी झगडत आहेत.

पालकांची मानसिकता की व्यवस्थेचा अपयश?आज क्लास लावणे ही गरज नसून फॅशन झाली आहे.“इतरांचे मूल जाते, आपलेही जावे” या मानसिकतेतून हजारो रुपये खर्च होतात.पण यामागे खरी चूक कोणाची? दिशाहीन  धोरणांची ?नियंत्रण नसलेल्या क्लासेसची?की चुकीच्या अपेक्षांची?आता तरी जागे व्हा!,ही वेळ आहे ठोस निर्णयांची:क्लासेससाठी परवाना बंधनकारक करा फीवर नियंत्रण आणा, जाहिरातींवर निर्बंध लावा,विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी ठरवा

अंतिम इशारा

आज मंत्री बोलत आहेत… उद्या पालक रस्त्यावर येतील…आणि परवा शिक्षण पूर्णपणे बाजाराच्या ताब्यात जाईल.“शिक्षण वाचवा… विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाचवा… आणि पालकांची लूट थांबवा!”

कर्मवीरांचा वारसा की क्लासेसचा बाजार? शिक्षणाच्या मूळ विचारांना तिलांजली?

गरीबांसाठी उभ्या राहिलेल्या शिक्षण व्यवस्थेवर महागड्या क्लासेसचा विळखा;आता तरी सर्वांनी आत्मपरीक्षण करणार का? गरीब, शेतकरी, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अक्षरशः आयुष्य झोकून दिले. त्यातूनच उभी राहिली रयत शिक्षण संस्था “शिका आणि कमवा” या तत्वावर चालणारी, समाजातील तळागाळातील मुलांना उभं करणारी क्रांतिकारी चळवळ.

त्या काळात ना कोचिंग क्लासेस होते, ना लाखोंची फी.पण त्याच व्यवस्थेतून डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक घडले.कारण एकच  शिक्षण हे सेवा आणि संस्कार मानले जात होते.

आजचे वास्तव – विचारांना तिलांजली?

आज मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे.महागडे क्लासेस, अव्वाच्या सव्वा फी, आणि “क्लासशिवाय काही नाही” ही मानसिकता यामुळे शिक्षणाचा मूळ हेतूच हरवताना दिसतो आहे.प्रश्न उपस्थित होतो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रुजवलेले विचार आपण विसरत आहोत का?गरीब विद्यार्थ्यांसाठी उभी राहिलेली व्यवस्था आज त्यांच्याच आवाक्याबाहेर जात नाहीये ना?क्लासेसचा विळखा – समानतेला तडाआज शिक्षण दोन भागांत विभागले जात आहे:ज्यांना महागडे क्लासेस परवडतातआणि ज्यांना नाही,हा फरक केवळ आर्थिक नाही, तर संधींच्या समानतेवर घाला आहे.वारशाचा अपमान की बदलती गरज?

काही जण म्हणतील – काळ बदलला, स्पर्धा वाढली.

पण मग प्रश्न उरतोच:स्पर्धा वाढली म्हणून शिक्षण विकायचे का? ज्ञानाच्या मंदिराला बाजारबनवायचे का? सर्वांनीच आत्मपरीक्षणाची वेळ ही केवळ शिक्षण क्षेत्राची समस्या नाही, तर सामाजिक प्रश्न आहे.म्हणूनच आता सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

पालकांनी – फॅशन म्हणून क्लासेसकडे धाव घेणे थांबवावेविद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा,नेत्यांनी  ठोस धोरणे आणावीत‌ शिक्षण संस्थांनी दर्जेदार शिक्षण देण्यावर भर द्यावा, विद्यापीठांनी क्लासेस संस्कृतीवर नियंत्रण आणावे अंतिम विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत ही समाजउद्धारासाठी होती, नफ्यासाठी नव्हे.आज जर तीच ज्योत क्लासेसच्या चकाकीत हरवत असेल,तर हा केवळ बदल नाही  हा विचारांचा पराभव आहे.“शिक्षण हे हक्क आहे, व्यापार नाही… हे पुन्हा एकदा ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे!”

 

Leave a Reply

You cannot copy content of this page