कोपरगावात कृत्रिम गॅस टंचाई?; ‘भारत गॅस’वर काळाबाजाराचा संशय – गगन हाडा आक्रमक

कोपरगावात कृत्रिम गॅस टंचाई?; ‘भारत गॅस’वर काळाबाजाराचा संशय – गगन हाडा आक्रमक

Artificial Gas Shortage in Kopargaon? Suspicion of Black Marketing Surrounds ‘Bharat Gas’ – Gagan Hada Takes an Aggressive Stance

ओटीपी येऊनही ४-५ दिवस सिलिंडर नाही; रांगा वाढल्या, प्रशासन झोपेत – तातडीने चौकशीची मागणी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 4Sat13.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शहरात घरगुती गॅसच्या टंचाईने नागरिक हैराण झाले असून ‘भारत गॅस’ वितरणात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू असल्याचा आरोप होत आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख गगन हाडा यांनी थेट गॅस कार्यालयाला भेट देत वस्तुस्थिती उघडकीस आणली.

कार्यालयासमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. अनेकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “बुकिंग करून २०-२१ दिवस झाले, ओटीपीही आला; मात्र ४-५ दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नाही.” काहींनी तर “आमच्या ऐवजी इतरांना टाक्या देऊन काळाबाजार केला जातो,” असा गंभीर आरोप केला.

याबाबत गॅस एजन्सी चालक वाघमारे यांना गगन हाडा यांनी  विचारले असता “वरूनच टाक्या कमी मिळतात” असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले. “जो प्रत्यक्ष येतो त्यालाच देतो,” असे सांगून व्यवस्थेतील ढिसाळपणा त्यांनीच कबूल केल्याचे गगन हाडा यांनी सांगितले.

याबाबत बोलताना गगन हाडा म्हणाले की दुसरीकडे, शहरात एचपी गॅसच्या गाड्या नियमित घरपोच सेवा देताना दिसत असतानाच भारत गॅससमोर मात्र रांगा – ही तफावत अनेक प्रश्न निर्माण करत आहे. विशेष म्हणजे हॉटेल व्यावसायिकांकडे गॅस मुबलक उपलब्ध असताना सामान्य नागरिक मात्र लाईनमध्ये उभे असल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

कोपरगाव तालुका पुरवठा निरीक्षक फोफसे यांच्याकडे तक्रार करताना शिवसेना शहराध्यक्ष गगन हाडा

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गगन हाडा यांनी तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुरवठा निरीक्षक फोपसे यांची भेट घेत तात्काळ कारवाईची मागणी केली. फोफसे यांनीही याची दखल घेत चौकशीचे आश्वासन दिले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, काही  नुकतीच आमदार आशुतोष काळे यांनी गॅस व इंधन टंचाईबाबत तहसील कार्यालयात हवा बैठक घेतली होती त्यात कडक सूचना दिल्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या प्रकारावर तात्काळ कारवाई करा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा गगन हाडा यांनी दिला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page