शिक्षिकेचा सन्मान, साहित्यिक योगदानाचा गौरव!
Honoring a Teacher, Celebrating Literary Contributions!
३२ वर्षांच्या सेवेनंतर सौ. कल्पना महानुभाव यांचा सेवानिवृत्ती सोहळा; ‘पोस्टर पैलवान’ कथासंग्रहाचे प्रकाशन
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 4Sat13.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“एकेकाळी घराच्या चौकटीत अडकलेली स्त्री आज शिक्षणाच्या बळावर समाजाला दिशा देत आहे,” असे ठाम प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले.
एस. जी. विद्यालयातील शिक्षिका सौ. कल्पना हिरालाल महानुभाव यांच्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आयोजित सेवानिवृत्ती सोहळा व त्यांच्या ‘पोस्टर पैलवान’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर प्रमुख पाहुणे म्हणून, तर अध्यक्षस्थानी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे होते.
प्रास्ताविकात हिरालाल महानुभाव यांनी पत्नीच्या योगदानाचा गौरव करताना, “सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,” असे नमूद केले.
चिन्मय उदगीरकर म्हणाले, “आजच्या मोबाईल युगात लेखन व वाचनाची परंपरा कमी होत आहे. अशा वेळी ‘पोस्टर पैलवान’सारखा कथासंग्रह समाजाला नवी दिशा देणारा ठरेल.”
राजेश परजणे यांनीही निःस्वार्थ कार्याचे महत्त्व अधोरेखित करत, “माणसात देव पाहून काम करणारी ही जोडी प्रेरणादायी आहे,” असे सांगितले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिक्षिका म्हणून दीर्घ सेवा आणि साहित्य निर्मितीचा संगम घडवत सौ. कल्पना महानुभाव यांनी समाजापुढे आदर्श उभा केला, असे एकमताने व्यक्त करण्यात आले.
Post Views:
11






