संजीवनीचे ९ विद्यार्थी थेट नोकरीत; कंपन्यांची पसंती
9 Sanjivani Students Secure Direct Placements; Companies Show Preference
आकर्षक पॅकेजची संधी; उद्योगसंपर्काचा थेट फायदा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 4Sat13.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण यांची सांगड घालत संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. नामांकित कंपन्यांनी थेट कॅम्पसवर येत एकाच वेळी ९ विद्यार्थ्यांची आकर्षक पॅकेजवर निवड केल्याने कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
स्वित्झर्लंडमधील बहुराष्ट्रीय ‘बुहलर अँड शेर्लर’ कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांना संधी दिली, तर ‘रॅक असेट मॅनेजमेंट सिस्टीम’ने सिव्हील व स्ट्रक्चरल शाखेतील पाच विद्यार्थ्यांची निवड केली. एकामागोमाग एक कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांना पसंती देत असल्याने पालक व विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
कॉलेज प्रशासनाने उद्योगांशी सातत्याने संवाद ठेवून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिल्याचा हा थेट परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. “कुशल अभियंते घडवणे हा आमचा ध्यास आहे,” ही भूमिका पुन्हा अधोरेखित झाली.
संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चौकट : ‘प्रोजेक्टमुळे मुलाखत गाजली!’
“अंतिम वर्षात उद्योगाभिमुख प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. ‘अँसिस इलेक्ट्रॉनिक्स डेस्कटॉप’ सॉफ्टवेअरचा वापर केल्याने मुलाखतीत आत्मविश्वास वाढला,” असे विद्यार्थी गणेश गायकवाड यांनी सांगितले.
Post Views:
9





