बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी शिवसेना रणांगणात!

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी शिवसेना रणांगणात!

Shiv Sena Enters the Fray for Balasaheb’s Birth Centenary Year!

कोपरगाव बैठकीत सचिन कोते यांचा एल्गार; “संघटना मजबूत करा, मतदार वाचवा!”

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 9Thu12.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव  : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना नव्या जोमाने उभी ठाकली असून, कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा देत संघटनात्मक ताकद वाढवण्याचा एल्गार पुकारला.

हे फक्त कार्यक्रम नाहीत,ही बाळासाहेबांच्या विचारांची पुनर्स्थापना आहे. जो निष्क्रिय राहील, तो मागे पडेल,” अशा रोखठोक शब्दांत कोते यांनी उपस्थितांना फटकारले!

जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान, वैद्यकीय शिबिरे, क्रीडा महोत्सव, वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धा यासह “बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी चषक” २०-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विचारवंतांच्या व्याख्यानमाला, शिवचरित्रकार नितीन बानुगडे पाटील यांची सभांमधील उपस्थिती आणि बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

“गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” ही मोहीम राबवून संघटना तळागाळात रुजवली पाहिजे. महिला आघाडीला नवसंजीवनी द्या, ज्येष्ठ शिवसैनिकांना पुन्हा मैदानात आणा आणि स्थानिक प्रश्नांवर संघर्ष यात्रेद्वारे जनतेत उतरा,” असे आदेश कोते यांनी दिले.

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियानावरही त्यांनी बोट ठेवले. “मतदार यादीतून एकही शिवसैनिक गळू देऊ नका. अन्यथा परिणाम गंभीर असतील,” असा थेट इशारा देत संबंधित बैठकींना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत एकच नारा घुमला — “बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर शिवसेना अधिक धारदार झाली पाहिजे!”

बैठकीस जिल्हा प्रमुख सचिन कोते, उपजिल्हा प्रमुख अस्लम शेख,शहर प्रमुख गगन हाडा, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब गव्हाने,प्रमोद लभडे, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,बाळासाहेब जाधव,मुन्ना मन्सुरी, वैभव शेलार,ऋषिकेश खैरनार,कान्हा हाडा, निखिल कंक्राळे,पियुष सैंदाने,राहुल हाडा, विनय टाक,दिनेश मरसाळे, समीर पटवेकर, शुभम वाघ,आबा पवार,शंतनु चावरे,अर्जुन मोरे,स्वप्निल निरभवने,शक्ती हाडा, साहिल पटवेकर, रहिम शेख,चेतन हाडा,तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page