“हिंदुत्व ही ओळख नव्हे, तर आत्मसन्मानाची जीवनशैली!” — कोपरगावच्या विराट संमेलनात राष्ट्रभावनेचा जाज्वल्य उद्रेक

हिंदुत्व ही ओळख नव्हे, तर आत्मसन्मानाची जीवनशैली!” — कोपरगावच्या विराट संमेलनात राष्ट्रभावनेचा जाज्वल्य उद्रेक

“Hindutva is not merely an identity, but a way of life rooted in self-respect!” — A Resplendent Outburst of National Spirit at the Massive Gathering in Kopargaon

संत-महंत, विचारवंतांच्या उपस्थितीत संस्कार, एकात्मता आणि राष्ट्रनिर्मितीचा निर्धार; घोषणांनी आसमंत दणाणला

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 13Mon19.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडलेल्या विराट हिंदू संमेलनाने कोपरगावच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात अक्षरशः नवा उर्जासंचार निर्माण केला. “हिंदुत्व ही कोणत्याही पक्षाची विचारसरणी नसून ती भारतीयांच्या रक्तात वाहणारी आत्मसन्मानाची जीवनशैली आहे,” असा ठाम आणि रोखठोक संदेश हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी दिला. त्यांच्या या भाषणाने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साहाची लाट उसळली.

पंच परिवर्तन ते राष्ट्रीय पुनर्निर्माण” या संकल्पनेवर आधारित या संमेलनात सामाजिक समरसता, स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. व्यासपीठावर संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे रमेश गिरी महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे परमानंद महाराज, राहुल मुनी महाराज यांच्यासह आक्रमक हिंदुत्ववादी विचारवंत भरत आमदापुरे यांची उपस्थिती संमेलनाची शोभा वाढवणारी ठरली.

धनंजय देसाईं  यांनी हिंदू म्हणजेच भारतीय आणि भारतीय म्हणजेच हिंदू  ही स्पष्ट भूमिका मांडत सास्कृतिक वारसा जपण्याचे आव्हान केले. बाह्य संकटांना तोंड देण्यासाठी समाजाने संघटित राहून सजगतेने पुढे जाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी आत्मविश्वासाने राष्ट्रभक्ती जागृत ठेवण्याचे आवाहन केले .

भरत आमदापुरे यांनी आपल्या धारदार भाषणातून “सत्य स्वीकारल्याशिवाय स्वबोध आणि शत्रूबोध शक्य नाही,” असे स्पष्ट करत हिंदू समाजाने आत्मपरीक्षण करून इतिहासातून शिकण्याची गरज अधोरेखित केली. सनातनी परंपरेचा गौरव राखत सर्वसमावेशक मूल्यांवर आधारित संघटित शक्ती उभी करण्याचा संदेश त्यांनी दिला.

रमेश गिरी महाराजांनी शताब्दी उत्सवानिमित्त कोपरगावकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत घराघरांत संस्कारांची ज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. संत परमानंद महाराजांनी “प्रत्येक श्वास भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण करा,” असे सांगत धर्माचरणातूनच सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात स्नेहा पंजाबी यांनी देशभक्तीपर कविता सादर करत वातावरण भारावून टाकले. “जय श्रीराम, हर हर महादेव, जय शिवराय” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवाजी महाराज, भारत माता, श्रीराम-सीता यांच्या वेशभूषेतील बालकलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दीपप्रज्वलन व भारतमातेच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर पसायदानाने समारोप झाला. प्रास्ताविक निकेतन कैलास गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन जयेश नवले यांनी तर आभार प्रदर्शन पवन गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन समिती सेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध, सुबक आणि प्रभावी पद्धतीने पार पाडत संमेलनाला भव्यता प्राप्त करून दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page