चैत्रोत्सवात सप्तशृंगी मित्र मंडळाची आंब्याची देखणी आरास; हजारो भाविकांची भक्तीमय उपस्थिती
Saptashrungi Mitra Mandal’s Exquisite Mango Decoration at the Chaitrotsav; Devout Presence of Thousands of Devotees
तोतापुरी आंब्यांच्या आरासीतून साकारली देवीभक्ती; १०१ दाम्पत्यांच्या हस्ते आरती, महाप्रसादाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 13Mon19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी मित्र मंडळाच्या वतीने यंदाही तोतापुरी आंब्यांची आकर्षक आरास साकारण्यात आली. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक सोहळ्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
रविवारी सायंकाळी ७ वाजता रमेश गिरी महाराज, नगराध्यक्ष पराग संधान व सौ. मोनिका संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत १०१ दाम्पत्यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी नगरसेवकांसह शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना १००१ विड्यांच्या पानांचा तांबूल प्रसाद देण्यात आला.
सकाळच्या सत्रात जुन्या गावठाण परिसरातून गोकर्ण गणेश मंदिर ते कापड बाजार अशी पादुका मिरवणूक काढण्यात आली. तसेच कुंकू-मार्चन सोहळाही उत्साहात पार पडला. श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी देवीची आरती झाली.
आरतीनंतर सुमारे साडेसात ते आठ वाजेपासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे साडेतीन ते चार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच प्रत्येक भाविकासाठी पाण्याच्या बाटल्यांची सोय करण्यात आल्याने नियोजनाची विशेष दखल घेण्यात आली.
या भव्य सोहळ्यासाठी या प्रभागातील नगरसेवक विक्रमादित्य सातभाई व नगरसेविका पद्मावती बागुल, अशिष निकुंभ, आनंद काळे, योगेश अमृतकर, प्रमोद बोराडे, मिलिंद कोतकर, सनी खैरे, समीर निकुंभ, नितीन जोशी, यश काळे, प्रशांत खैरनार, बंटी हलवाई, दिनेश दारुणकर, दत्ता शिरोडे, महावीर सोनी, पियुष गंगवाल, कुणाल लोणारी, शुभम भावसार, निखिल जोशी, विकास खैरनार, जितू पगारे, योगेश पवार, सचिन अमृतकर आदींसह मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमात श्रद्धा, सेवा आणि सुयोग्य नियोजन यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
Post Views:
6








