ज्येष्ठ नेत्यावर हल्ल्याची ठिणगी; पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादीचा बहिष्कार 

ज्येष्ठ नेत्यावर हल्ल्याची ठिणगी; पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादीचा बहिष्कार 

Attack on Senior Leader Sparks Outrage; NCP Boycotts Municipal General Body Meeting

श्रेयवाद, दमदाटी आणि जनतेची दिशाभूल; राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्लाबोल

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 22 aWed 13.00 Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर प्रभाग क्रमांक ३ मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर सभागृहाच्या भूमिपूजनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आढाव यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ आजच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या १२ नगरसेवकांनी बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांविरोधात उघड राजकीय रणशिंग फुंकले. 

या निर्णयाची घोषणा करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर श्रेयवाद, दमदाटी आणि जनतेची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले.

“शहर विकासाला आमचा विरोध नाही; पण विकासाच्या नावाखाली श्रेयासाठी गलिच्छ राजकारण आणि शहराची शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीला आम्ही कधीही साथ देणार नाही,” असा थेट इशारा गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी दिला. त्यांनी निवडणुकीपासून सत्ताधारी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका करत, “कामांपेक्षा श्रेयासाठी भांडण हाच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा बनला आहे,” असा आरोप केला.

शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी तर सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवत, “जनतेत संभ्रम निर्माण करणे आणि सत्याचा विपर्यास करणे हा त्यांचा जुना उद्योग आहे,” असा घणाघात केला. आमदार आशुतोष काळे यांनी तलाव दुरुस्ती आणि खोलीकरणाबाबत दिलेल्या पत्राचा संदर्भ देत, त्याचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करण्याऐवजी श्रेयासाठी दमदाटी आणि दिखाऊ राजकारण सुरू आहे,” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

“बोलायचे एक आणि करायचे दुसरे, हा सत्ताधाऱ्यांचा दुटप्पी चेहरा आता जनतेसमोर उघडा पडला आहे. वेळ पडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा स्पष्ट इशारा देत गंगुले यांनी राजकीय वातावरण अधिक तापवले. पत्रकार परिषदेत मंदार पहाडे, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब रुईकर, कृष्णा आढाव, सचिन गवारे, सागर आहेर यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक हाजी मेहमूद सय्यद यांनी तर आभार प्रदर्शन रमेश गवळी यांनी केले.

चौकट

पहिल्याच सर्वसाधारण सभेला गालबोट!विरोधकांचा बहिष्कार; “जागा नाही” म्हणत पत्रकारांना मज्जाव — पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

निवडणुकीनंतर नव्या सभागृहाची पहिलीच सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली. एका बाजूला ज्येष्ठ नेत्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला; तर दुसऱ्या बाजूला “सभागृहात जागा अपुरी” या कारणावरून पत्रकारांनाच प्रवेश नाकारल्याने संताप उसळला. लोकशाहीचा कणा असलेल्या प्रसार माध्यमांना दूर ठेवल्यामुळे  उलट सुलट  चर्चेला उधान आले आहे.

गौतम बँकेच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष कृष्णा आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजेंद्र आभाळे, सचिन परदेशी, नगरसेवक गटनेत्या गौरी पहाडे,निर्मला आढाव, माधवी वाघचौरे, स्मिता साबळे, सोनाली कपिले,सोनम त्रिभुवन, हाजी महमूद सय्यद, राहुल शिरसाट, वाल्मीक लहीरे, इम्तियाज आत्तार ,बाळासाहेब रूईकर, बाळासाहेब आढाव, डॉ. तुषार गलांडे,रमेश गवळी,सचीन गवारे, राजेंद्र बोरावके, योगेश वाणी,  विजय बागडे, गणेश गोसावी,सुनील गलांडे, दिनकरराव खरे, इग्तीयाज अत्तार, शैलेश साबळे, मयुर राउत,  शशीकांत शेळके, राशीनकर काका, कर्डक सर, सिद्धार्य शेळके,आतिश बोरुडे, निलेश आढाव,, चिन्मय  नागरे, राकेश गवते, मयुर राऊत , विजय त्रिभुवन, सुनील फंड, मुकुंद भुतडा, ओम  रुषीकेश आढाव,राजेन्द्र खैरनार, तन्मय साबळे, नाजीम शेख, प्रदीप कुऱ्हाडे, बाळू गोर्डे, जावेद शेख, अनिल नरोडे, विकी चांदर, संदीप कपिले, राकेश गवारे, अमित आगलावे, आदी सह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page