कोपरगावात सोमवारी ८ नवे रुग्ण, सध्या १७६ रुग्णांवर उपचार सुरू, २१ जणांना डिस्चार्ज

कोपरगावात सोमवारी ८ नवे रुग्ण, सध्या १७६ रुग्णांवर उपचार सुरू, २१ जणांना डिस्चार्ज

कोपरगाव कोरोना अपडेट : २०५६ स्वॅब तपासणी १७१४ निगेटिव्ह तर ३४२ पॉझिटिव्ह, १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ४ जणांचा मृत्यू, १७६ रुग्णावर उपचार सुरू

वृत्तवेध ऑनलाईन। 10 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 16:25

कोपरगाव : सोमवारी सकाळी ३२ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात ८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २१ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ६ जणांचे नमुने नगर पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

८ पॉझिटिव्ह रुग्णात : अंचलगाव येथे ३ रूग्ण तर झगडे-फाटा १ , पोहेगाव १ व इंदिरापथ येथे १ गांधीनगर भागात १ तर ब्रिजलालानगर येथे १ रूग्ण यांचा समावेश आहे.अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, सोमवारी
( १० ऑगस्ट) रोजी सकाळी कोपरगाव येथे ३२ जणांचे नमुने रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात ८ एॅक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित २४ अहवाल निगेटिव्ह आले नगर येथे ६ तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
(१० ऑगस्ट पर्यंत) २ हजार ०५६ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ हजार ७१४ तपासणी अहवाल निगेटिव्ह तर ३४२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोपरगाव कोविड सेंटरमध्ये सध्या ऍक्टिव्ह १७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पॉझिटिव्ह रुग्ण प्रमाण १६.६२ टक्के आहे तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४८.२० टक्के इतके आहे दुदैवाने मृत्यूचे प्रमाण १.२१ टक्के आहे सँम्पल पर मिलियन ७९२० आहे अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोविड सेंटर क्षमतेबाबत विचारले असता डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) म्हणाले, एस एस जी एम कॉलेज कोविड सेंटर मध्ये १८० रुग्णांची क्षमता आहे, आत्मा मलिक हॉस्पिटल येथे २०० रुग्णांची क्षमता आहे. तर मूकबधिर विद्यालयात ५० रुग्णांची क्षमता आहे. रुग्ण वाढत असले तरी रुग्ण घरी जाण्याचे प्रमाणही चांगले आहे त्यामुळे अजून तरी फारशी अडचण नाही असेही त्यांनी सांगितले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page