संजीवनी पाॅलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू – अमित कोल्हे

संजीवनी पाॅलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू – अमित कोल्हे

In Sanjeevani Polytechnic
First year admission process started – Amit Kolhe

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र

संजीवनी पॉलिटेक्निक

वृत्तवेध ऑनलाईन। 10 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 17:45

कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक मधिल अद्ययावत संगणकीय साधन सामुग्री, पुरेशा क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग, इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालय, मुंबई (डी.टी.ई.) च्या वतीने संजीवनी मध्ये २०२०-२१ च्या प्रथम वर्ष पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी दि. १० ऑगस्ट पासुन कोविड १९ चे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजाणी करून ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले असुन विद्यार्थ्यांनी
(दि. २५ऑगस्ट) पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

अमित कोल्हे यांनी सांगीतले आहे की भारतीय नागरीकत्व असेलेला विद्यार्थी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इ. १० वी च्या अथवा तत्सम परीक्षेत किमान ३५ टक्के गुणांनी उत्तिर्ण असावा. याप्रमाणे प्रवेश पात्रता धारण केलेले विद्यार्थी येथिल सुविधा केंद्राच्या मार्फत संजीवनीसह महाराष्ट्रात कोठेही प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. विध्यार्थ्यांना या केंद्रामार्फत त्यांचा कल आणि सध्या मागणी असलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांसाठी आता पाॅलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया व पदविका अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केल्यावर भविष्यातील संधी हे जाणुन घेण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही. या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी संजीवनी सुविधा केंद्रास भेट देवुन ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी, उमेदवारांच्या जाती निहाय संवर्गानुसार आवश्यक कागदपत्रे व इतर माहितीसाठी या केंद्रातुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ञ प्राद्यापकांची या केंद्रात नेमणुक केली असुन शिष्यवृत्या , शैक्षणिक कर्ज व त्यासाठी लागणारे कागदपत्रे, तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे या संदर्भात सखोल माहिती येथे मिळणार आहे.
या केंद्रामार्फत ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चिती करणे इत्यादी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यातील सर्व साधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याबाहेरील (ओएमएस) विध्यार्थ्यांसाठी रू ४०० तर फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी रू ३०० शुल्क भरावे लागेल. दोनही प्रकारचे शुल्क क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बॅन्कींगद्वारे अदा करावे लागेल. एखाद्याकडे यातील काहीच नसेल तर त्यासाठी पर्याय दिले जातील. विकल्प (ऑप्शन ) देणे, मेरीट लिस्ट घोषित होणे, प्रवेश फेऱ्या , इत्यादी बाबींचे वेळापत्रक डीटीई मार्फत लवकरच जाहिर केले जाणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा, असे आवाहन अमित कोल्हे यांनी शेवटी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page