कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे , कांदा -डाळींब मार्केट सुरु
Onion-pomegranate market started
वृत्तवेध ऑनलाईन। 11 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 20 :15
कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे , कांदा डाळींब मार्केट बुधवार पासून सुरु करण्यात आले आहे.आज मार्केटमध्ये ४१४० क्विंटल कांदा आवक झाली आहे. २२२३ कॅरेट डाळिंब आवक झाली आहे अशी माहिती सभापती संभाजी पा. रक्ताटे यांनी दिली.
यंदा कांद्याचे उच्चांकी उत्पादन झाले. त्यात कोरोनाचा दणका यामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. बुधवारी (११ऑगस्ट) रोजी कोपरगाव बाजार समितीमध्ये ४१४० क्विंटल कांदा आवक झाली कांदा नंबर एक ७०० ते ९५१ रुपये, कांदा नंबर २ – ५०० ते ६७५ रुपये,गोल्टी २०० ते ६०० रुपये, जोड कांदा १०० ते २०० रुपये भाव मिळाला असल्याची माहिती उपसभापती राजेंद्र पा. निकोले यांनी दिली.
६७५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. एकीकडे मार्केट सुरू झाल्याचा आनंद असताना तर दुसरीकडे मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील वर्षी उन्हाळ कांद्याला सरासरी हजार अकराशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. बुधवारी (११ऑगस्ट) रोजी सरासरी ६७५ रुपये दराने कांदा विक्री करण्याची वेळ शेतकरी बांधवावर आली आहे. कोरोनामुळे शेतात पिकविलेल्या मालाला बाजारपेठ राहिली नाही. खरीप हंगामाची पेरणीसुद्धा कर्जातून केली. चाळीत साठवलेल्या कांद्याला बाजारभाव मिळेल या आशेपोटी कांदा साठवला. सध्या फक्त पाच ते सात रुपये भाव मिळत आहे. मात्र, चाळीतून दुर्गंधी येऊन पाणी बाहेर पडू लागल्याने आता तरी कांद्याला योग्य बाजारभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बुधवारी कोपरगाव बाजार समिती मार्केट मध्ये प्रत्येकी २० किलो अशा २२२३ कॅरेट डाळिंब आवक झाली आहे
डाळिंब नंबर १- ८०० ते १३०० रुपये, डाळिंब नंबर २ – ४५० ते ७७५ रुपये, डाळिंब नंबर ३ -१०० ते ४२५ रुपये भाव मिळाला आहे अशी माहिती सभापती संभाजी पाटील रक्ताटे यांनी दिली आहे.
डाळिंब लिलाव- सोमवार ते शनिवार, कांदा लिलाव – मंगळवार ते शनिवार , भुसार माल लिलाव सोमवार, बुधवार व शुक्रवार या वारी राहील अशी माहिती सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली.
आता मार्केटमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ठराविक गाड्या आता सोडण्यात येत आहेत.