कोपरगावात बुधवारी २० नवे रुग्ण, सध्या १०९ रुग्णांवर उपचार सुरू, ४७ जणांना डिस्चार्ज

कोपरगावात बुधवारी २० नवे रुग्ण, सध्या १०९ रुग्णांवर उपचार सुरू, ४७ जणांना डिस्चार्ज

कोपरगाव कोरोना अपडेट : २१२९ स्वॅब तपासणी यात ६४४ नगर,१४८५ रॅपिड टेस्ट, १७५८ निगेटिव्ह तर ३७१ पॉझिटिव्ह, २५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू, १०९ रुग्णावर उपचार सुरू

वृत्तवेध ऑनलाईन। 12 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:45

कोपरगाव : बुधवारी सकाळी ४५ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात १७ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर २८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४७ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ८ जणांचे नमुने नगर पाठविण्यात आले होते त्यापैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी दिवसभरात २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

२० पॉझिटिव्ह रुग्णात : सुभद्रानगर ५, धारणगाव रोड ३, गांधी नगर ४,चांदेकसारे २, इंदिरानगर २, साईप्रभानगर १, काले टावर १,गजानन नगर १, लक्ष्मी नगर १ यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, बुधवारी
( १२ऑगस्ट) रोजी सकाळी कोपरगाव येथे ४५ जणांचे नमुने रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी द्वारे तपासण्यात आले यात १७ एॅक्टिव रुग्ण आढळून आले तर उर्वरित २८ अहवाल निगेटिव्ह आले नगर येथे ८ तपासणीसाठी पाठविण्यात आले त्यात ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाच निगेटिव्ह अहवाल आले असल्याचे त्यांनी सांगितले.

(१२ ऑगस्ट पर्यंत) २ हजार १२९ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ हजार ७५८ तपासणी अहवाल निगेटिव्ह तर ३७१ अहवाल पॉझिटिव्ह आले असून २५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोपरगाव कोविड सेंटरमध्ये सध्या ऍक्टिव्ह १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पॉझिटिव्ह रुग्ण प्रमाण १७.४२ टक्के आहे तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.२७ टक्के इतके आहे दुदैवाने मृत्यूचे प्रमाण १.३४ टक्के आहे सँम्पल पर मिलियन ८५१६ आहे अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोविड सेंटर क्षमतेबाबत विचारले असता डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) म्हणाले, एस एस जी एम कॉलेज कोविड सेंटर मध्ये १८० रुग्णांची क्षमता आहे, आत्मा मलिक हॉस्पिटल येथे २०० रुग्णांची क्षमता आहे. तर मूकबधिर विद्यालयात ५० रुग्णांची क्षमता आहे. रुग्ण वाढत असले तरी रुग्ण घरी जाण्याचे प्रमाणही चांगले आहे त्यामुळे अजून तरी फारशी अडचण नाही असेही त्यांनी सांगितले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page