पोहेगाव ते डोऱ्हाळे रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करा… सरपंच औताडे
वृत्तवेध ऑनलाईन। 12 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 16:45
By: Rajendra Salkar, 16:45
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव – डोऱ्हाळे हा रस्ता कोपरगाव , राहाता व श्रीरामपुर अश्या ३ तालुक्यांचा दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करावे अशी मागणी पोहेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल औताडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे केली आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की पोहेगाव या गावामधे मध्यवर्ती बाजारपेठ असुन परिसरातील २० ते २५ गावांचा दैनंदिन संपर्क ह्या गावाशी आहे. तसेच गावामधे महाविद्यालये , प्राथमिक आरोग्य केंद्र , महसुल मंडळ , कृषी मंडळ , पोलीस दुरक्षेत्र , विजवितरण , बँका,सहकारी संस्था, वित्तीय संस्था, इ. विविध कार्यालये आहेत. व इतर सोईसुविधा उपलब्ध असल्यामुळे या रस्त्याचा परिसरातील शेतकरी तसेच विद्यार्थी वर्गाला पोहेगावाशी दैनंदिन दळणवळणाकरिता उपयोग होतो.
ह्या रस्त्यालगत परिसरातील डो-हाळे , को-हाळे , केलवड, आडगाव, नांदुर्खी , साकुरी , राहाता व इतर गावे येत असल्याने सदर गावाशी जोडणारा मुख्य रस्ता म्हणुन ह्या रस्त्याचा वापर होतो तसेच शिर्डी,राहाता व लोणी-प्रवरानगर येथे वैद्यकिय उपचारासाठी ये – जा करण्याकरिता अत्यंत जवळचा मार्ग म्हणुन ह्या रस्त्याशी दैनंदिन संबंध येतो. परंतु सद्यस्थितीत सदर रस्तावर मोठ-मोठी खड्डे पडल्याने तसेच साईट पट्ट्या खचल्याने सदरचा रस्ता नादुरुस्त आहे. परिणामी ह्या रस्त्यावरील वहिवाट पुर्णत: बंद झालेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतक-यांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असुन, दैनंदिन दळणवळणाकरीता जवळचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने शेतकरी , विद्यार्थी व नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत.
सदर रस्त्याचे काम हे लवकरात लवकर पूर्ण झाल्यास परिसरातील सर्व नागरिकांची दैनंदिन दळणवळणाची समस्या सुटणार आहे.तरी सदर रस्ता दुरुस्तीचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात यावे अशी मागणी सरपंच अमोल औताडे यांनी खा. सदाशिव लोंखडे यांच्या कडे केली आहे.
Post Views:
279