कोपरगाव जेलची भिंत चार कैद्यांनी कोरली, पळून जायचा प्रयत्न फसला

कोपरगाव जेलची भिंत चार कैद्यांनी कोरली, पळून जायचा प्रयत्न फसला

वृत्तवेध ऑनलाईन। 12 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 21:05

कोपरगाव : पोलिसांच्या तावडीतून आणि तुरुंगातून कैदी पळून जाण्याचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. कोपरगाव जेलमधील चार कैदी भिंतीला भगदाड पाडून पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी तैनात असलेल्या गार्डला ही बाब लक्षात आल्यानं कैद्यांचा हा प्रयत्न फसलाय.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १२ ऑगस्ट रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास नंबर ५ च्या मागील शौचालयाच्या भिंतीला लोखंडी पट्टी च्या साहाय्याने कोरून अनिल ज्ञानदेव शिंदे (२३), नारायण राम प्रसाद बसनेत (२७), किरण उर्फ अॅन्थोनी छगन सोनवणे (३२), विकी विष्णू चावरे (२९), यांनी कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट जेल गार्ड पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष बाबुराव आव्हाड यांच्या लक्षात आल्याने कैद्यांचा हा प्रयत्न फसला आहे. सध्या चारही कैदी माननीय न्यायालयीन कोठडीत आहे याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भारत नागरे करीत आहेत.
याआधी कोपरगाव सब जेलमध्ये कैदी कैदी फरार होण्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत फरार आरोपींना अटक केली होती . राज्यात कैदी फरार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

Leave a Reply

You cannot copy content of this page