विकासाचे ध्येय बाळगणारा नेता:- मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

विकासाचे ध्येय बाळगणारा नेता:- मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

   वृत्तवेध ऑनलाईन | 15 Aug 2020, By : RajendraSalkar 18 :30

  सावकारशाही नष्ट होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी म्हणून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची स्थापना करुन आमदनगर जिल्हयाला विकासाची दिशा देऊन सामाजिक कार्याचा नवा इतिहास घडविणारे ,स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे निकटचे सहकारी लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील यांचा विधायक व विकासाची दृष्टी असणारा वारसा त्यांचे सुपुत्र मा. आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील व मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील आज समर्थपणे चालवत आहेत. जिल्ह्यातील संयमी व सुसंस्कृत कुंटुब म्हणून घुले कुंटुबांकडे पाहिले जाते .मितभाषी ,उत्तम निर्णय क्षमता ,संयम,सुसंस्कृतपणा,दृढ निश्चय, जिद्द या गुणांच्या जोरावर मा.आ. मा.चंद्रशेखर घुले पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे .

  बालपणातच त्यांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले. लहान वयातच मातृछत्र हरपल्याने स्वावलंबन, ममत्व,परोपकार व संघर्ष यांचे धडे त्यांना मिळाले . बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण घेत असताना स्टुडंट कौन्सिलच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. सामाजिक कार्याला सुरुवात केली.
सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून सामाजिक कार्यात आघाडी घेतली . त्यांचा जनसंपर्क फार मोठा व प्रभावी आहे. माजीकेंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विधायक विचार युवकांपर्यंत पोहचवून जिल्ह्यात मोठे संघटन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा नावलौकिक व विश्वासार्हता वाढविली .संघटना मजबूत केली.कार्यकर्त्यांना ताकद व विश्वास दिला .
शेती व शेतीपूरक व्यवसायांना त्यांनी प्राधान्य दिले. आज त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यरत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना,श्री.मारुतरावजी घुले पा.शिक्षण संस्था,जनता शिक्षण प्रसारक मंडळ, शेवगाव बाजार समिती,जिनिंग प्रसिंग प्रकल्प, शेवगाव तालुका पंचायत समिती, कृषी विज्ञान केंद्र या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने विक्रमी ऊस गळीत करुन महाराष्ट्रात अनेकदा उच्चांक प्रस्थापित केले आहेत. त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळ व श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचा विस्तार करुन ग्रामीण भागात शेतकरी कष्टकऱ्यांच्या दारात शिक्षणाची गंगा आणली. या माध्यमातून ग्रामीण भागातल्या हजारो मुलामुलींना आपले भविष्य उज्ज्वल करता आले ,आपले स्वप्न साकार करता आले. आनेकांना प्रशासनात जिल्हाधिकारी, न्यायाधिश, सैनिक, तहसीलदार , शास्त्रज्ञ ,पी.आय. होण्याची संधी मिळाली..दारिद्र्य व अज्ञानात खितपत पडलेल्या शेतकर्यांना विकासाकडे घेऊन जाण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना पाच वर्ष त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, दुष्काळात जनावरांसाठी चारा छावण्या, धरणग्रस्तांचे प्रश्न, जायकवाडी टप्पा दोन प्रकल्प, पाणी पुरवठा योजना इत्यादी सामान्य माणसाला दिलासा देणारे प्रश्न त्यांनी सत्तेत असताना मार्गी लावले. आज शेवगाव – पाथर्डी मतदार संघात सत्तेत नसल्याने त्यांची उणीव शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेला भासत आहे.
सन२O १९ला झालेल्या विधानसभा निवडणूकीत दुसऱ्यांना संधी देण्याचा आपले वडील लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचा वारसा त्यांनी कृतीत आणला .निवडून येण्याची क्षमता असूनही त्यांनी स्वतः थांबून शेवगाव पाथर्डी मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे मा. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी मिळवून देऊन शेवगाव तालुक्यातून मताधिक्य मिळवून दिले. नेवासा मतदार संघात मा.ना.शंकरराव गडाख यांना मोठया मताधिक्याने विजयी केले.
   शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी केलेली विकासकामे आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहेत. मतदार संघात वीज,पाणी,शिक्षण,रस्ते,तीर्थक्षेत्र विकास या क्षेत्रात त्यांनी भरीव कामे केली. स्वातंत्र्यानंतर पाथर्डीच्या दुर्गम भागात त्यांच्या प्रयत्नातून वीज आली. शेवगाव तालुक्यात वाघोली, मळेगाव, ढोरजळगाव येथील भव्य बंधारे, जमातखाने, आंबेडकर भवन अशी छोटी मोठी अनेक कामे सांगता येतील. कुठल्याही राजकीय वादात पडून एकमेकांवर टीका करण्यापेक्षा सदैव कृतिशील राहून विकासाचे ध्येय बाळगून सामान्य माणसांची प्रगती साधण्यावर त्यांनी भर दिला .ज्ञानेश्वर कारखान्याचे सात हजार पाचशे मेट्रिक टनापर्यंत विस्तारीकरण,३२ मेगावॉट क्षमतेचा सहवीज प्रकल्प, अहमदनगर  सहकारी बँकेच्या माध्यमातून जायकवाडी धरणग्रस्त व गोदाकाठच्या शेतकर्यांना पाईप लाईनसाठी कर्ज पुरवठा, शेतकर्यांना वीज जोडणीसाठी कारखान्यामार्फत अर्थसाहाय,ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन, ठिबक सिंचनासाठी अनुदान ही सर्व लोकाभिमुख कामे पाहता विकास कार्याचा झंझावात शेतकरी ,कष्टकरी यांचे जीवनमान उंचावत ठेवणारा आहे. मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांचे संघटन कौशल्य,विकासाची दूरदृष्टी,सामान्य माणसाच्या उन्नतीची तळमळ,धडाडी व कार्याची प्रचंड क्षमता पाहून मा.शरदराव पवार यांनी त्यांच्यावर राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. राज्यातील साखर कारखानदारीला उर्जित अवस्था आणण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, डेक्कन शुगर टेक्नोलॉजीस्ट असोसिअशन चे सदस्य, शुगर टेक्नोलॉजीस्ट असोसिअशन ऑफ इंडिया चे सदस्य, अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष इत्यादी पदावर काम करताना त्यांनी आपले वेगळेपण वेळोवेळी सिध्द केले . सत्ता ही सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी वापरायची हा लोकनेते मारुतरावजी घुले पाटलांनी दिलेला मंत्र त्यांनी जीवापाड जपला आहे. त्यांचाच आदर्श घेऊन सौ. राजश्रीताई घुले पाटील या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर डॉ. क्षितिज घुले पाटील शेवगाव पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकंदरीत मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी अल्पावधीत केलेली विकास कामे आश्चर्यचकित करणारी आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे. त्यांची भविष्यातील वाटचाल दैदिप्यमान असणार आहे. हेच त्यांनी केलेल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
      वाढदिवसाच्या  निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो व उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो हीच शुभकामना.
शब्दांकन :भाऊसाहेब सावंत
संकलन . बाळासाहेब आरगडे

 

Leave a Reply

You cannot copy content of this page