मळेगांवथडीचे मातृत्व हरपले-आमदार आशुतोष काळे
सत्यभामा दवंगे यांचे दुःखद निधन
कोपरगांवः मळेगांवथडी येथिल वारकरी संप्रदायाच्या अनुयायी सत्यभामा लक्ष्मण दवंगे यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. मळेगांवथडी येथिल सरपंच गोरख लक्ष्मण दवंगे व निवृत्त स्वातंत्र्य सैनिक सावळेराम लक्ष्मण दवंगे यांच्या त्या मातोश्री होत्या. ‘सत्यभामा दवंगे यांचे निधनामुळे मळेगांवथडी ग्रामस्थांचे मातृत्व हरपले असुन दवंगे कुटुंबीय व ग्रामस्थांना या दुःखातुन सावरण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो’, अषा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी कै. दवंगे यांना श्रध्दांजली वाहीली आहे.
कै. सत्यभामा दवंगे यांचे पश्चात चार मुलं, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. गावातील जुन्या रूढी, परंपरा, चालीरिती, वेगवेगळे उत्सव, इत्यादीं विषयी मार्गदर्शनासाठी नविन पिढीतील अनेक जण त्यांच्याकडे जात असे. गावातील एक आदर्श माता म्हणुन सर्वांनाच त्यांचे आशीर्वाद असे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व मळेगांवथडीचे रहीवासी अरूण चंद्रे यांनीही कै. सत्यभामा दवंगे यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहुन तिव्र दुःख व्यक्त केले आहे.