कोकण वादळग्रस्तांना “निसर्गाच्या पाऊलखुणा” या गिर्यारोहण संस्थेचा मदतीचा हात,

 

कोकण वादळग्रस्तांना “निसर्गाच्या पाऊलखुणा” या गिर्यारोहण संस्थेचा मदतीचा हात,

या संस्थेत कोपरगावच्या भूमिपुत्रांचा समावेश
कोपरगाव
कोकणातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्री वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. या वादळात अनेक घरांचे, वस्ती वाड्यांचे व बागांचे अतोनात नुकसान झाले. आधीच कोरोनाचे संकट त्यातनिसर्ग चक्री वादळ झाल्याने येथील अनेक लोक हताश झाले.

नेहमीप्रमाणे पंचनामे आदी शासकीय सोपस्कार पार पडले काहींना तोंड दाखले मदत मिळाली तर अनेक गावे वाड्या-वस्त्या मदतीपासून आजही वंचित आहे त्यात दापोली व मंडणगड तालुक्यातील अनेक आड गावांना कोणत्याही प्रकारची मदत आजतागायत मिळाली नसल्याची माहिती मिळताच याची दखल सहा वर्षापासून कार्यरत असलेली “निसर्गाच्या पाऊलखुणा” ही गिर्यारोहण संस्था आपल्या 28 सदस्यांच्या बळावर मदतीसाठी पुढे आली.

गेल्या पंधरा दिवसापासून प्रथम या सर्व गावांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने ऐकून 109 गावांची पाहणी झाली व मदतीपासून वंचित अशा ४ गावात दि.२३ जून २०२० त्वरित मदत करण्यात आली व दि.२८ जून २०२० रोजी धान्य वाटप केले.

मंडणगड तालुक्यातील आतले गाव व गावठाण, आतले सडे व बुद्धवाडी, नायणे राववाडी,नायणे मालेवाडी, नायणे कोंडवाडी, देव्हारे मालेगाव वाडी तसेच कबर गाणी या सर्व गावात एकूण 3975 किलो धान्य आत्तापर्यंत वाटप करण्यात आले असल्याचे रोहित ने सांगितले.

प्रत्येक पॅकेट मध्ये १५ दिवस पुरेल इतके धान्य देण्यात आले.ज्यामध्ये तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, गोडेतेल, तिखट, हळद, मीठ, बिस्कीट पुडे वगैरे मिळून एकूण १५ किलो समान होते.

दि.२१ जून २०२० रोजी संस्थेचे सदस्य पुणे येथील श्वेता भुवड, कोपरगाव येथील सामाजिक वनीकरण मधील अनिल सिनगर यांचा मुलगा रोहित सिनगर, राहुल माळी, संस्थापिका भक्ती भुवड चिपळूण येथील जयदीप जोशी व प्रतापगड येथील अजित जाधव या ग्रुप लीडर 28 तरुणांनाचा समावेश आहे.

तसेच ज्या वाड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले त्या गावात म्हणजेच देव्हारे येथील मालेगाव वाडी व मंडणगड शहरातील गांधीनगर व इतर भागात जाऊन निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.यासाठी अलर्ट सिटीझन फोरम मुंबई, परेशदादा कोऱ्हे मित्रमंडळ जोगेश्वरी तसेच जय जवान गोविंदा पथक मुंबई या स्वयंसेवी संघटनांनी तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत केली.

तसेच संस्था अजून पुढील 2 ते 3 महिने तिथे आपले कार्य चालू ठेवणार आहे. शक्य त्या सर्व लोकांनी आर्थिक, वस्तुरूप अथवा शारीरिक मदत करायची इच्छा असल्यास आधिक माहिती साठी व मदती साठी संपर्क क्रमांक :- रोहित सिनगर – 8793503064 यांच्याशी संपर्क साधावा. सर्व स्तरावरून निसर्गाच्या पाऊलखुणा या संस्थेचे व पर्यायाने या तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

चौकट
प्रसिद्धीपासून दूर या संस्थेच्या माध्यमातून सुमारे पाच हजार जणांची टीम कोकणातील विविध भागात वादळानंतर ते आजतागायत पर्यंत कार्यरत आहे या भागात कोरोना चा फारसा प्रभाव नाही असे पुणे येथे दहा वर्षापासून काम करीत असलेल्या सिनगर यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page