कोपगावात एक गाव, एक गणपती’ची शासकीय अधिकार्‍यांच्या हस्ते स्थापना

कोपगावात एक गाव, एक गणपती’ची शासकीय अधिकार्‍यांच्या हस्ते स्थापना

वृत्तवेध ऑनलाईन। 22 Aug 2020, By: Rajendra Salkar, 19 :35

कोपरगाव : कोपरगाव शहरामध्ये शंभर वर्षाच्या परंपरा खंडित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद कोपरगाव शहरात ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना उदयास आली असून शनिवारी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली आहे.

विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन झाले. कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवावर खूपच निर्बंध लादले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने एक गाव गणपती या संकल्पनेचे आवाहन केल्यामुळे शनिवारी (२२) रोजी शहरात एक गाव एक गणपती स्थापना करून या संकल्पनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास तहसीलदार श्री. व सौ. योगेश चंद्रे व मुख्याधिकारी श्री. व सौ. प्रशांत सरोदे यांच्या हस्ते शहराच्या वतीने एक गाव एक गणरायाची विधिवत स्थापना विघ्नेश्वर चौकातील विघ्नेश्वर गणेश मंदिर व श्री दत्त मंदिर या दोन्ही मंदिरामधील जागेत करण्यात आली.

एक गाव एक गणपती

यावेळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर नगरसेवक नागरिक सुरक्षित अंतर ठेऊन हजर होते.

गणेशोत्सवाच्या शांतता समिती बैठकीमध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती ही संकल्पना पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी मांडली होती. व त्या संकल्पनेचे उपस्थित शहरातील सर्व तरुण मंडळांनी एक मुखी स्वागत करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ठरल्याप्रमाणे यावर्षी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यांमध्ये एकाही मंडळाने गणेश स्थापनेसाठी परवानगी अर्ज केला नव्हता, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली आहे. यामुळे नागरिक घरगुती गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

गणेश मंडळांना सोशल डिस्टन्सिंगसह स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे जगजीवन विस्कळीत झाले असून उद्योग व व्यवसाय यांची घडी बसलेली नाही त्यात ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ग्रामीण, व शहरातील विविध मंडळानी साध्या पद्धतीने घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गणेश मंडळांची संख्या देखील घटली असून बाल गणेश मंडळे मर्यादित आहेत. गेल्या वर्षी शहरात सत्तर-ऐंशी मंडळांचे गणपती बसविण्यात आले होते. त्यात कोपरगाव पोलिस स्टेशन हद्दीत कोपरगाव शहरात ४० मोठ्या गणेश मंडळानी तर ग्रामीण भागात २५ मोठ्या गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. कळवण शहरात ५० लहान गणेश मंडळानी तर ग्रामीण भागात ४० लहान गणेश मंडळानी गणरायाची स्थापना केली होती. सर्व तालुक्यात २५० गणपती मंडळे होती. शहरात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे खेळायला. यंदा मात्र सर्वांनी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page