कोपरगावात भंगार व्यावसायिकाच्या खिशातून सव्वा लाख पळविले
वृत्तवेध ऑनलाइन , 25 Aug, 2020
By: Rajendra Salkar 17:30
कोपरगाव : बँकेत भरणा करण्यास जात असलेल्या भंगार व्यावसायिकाकडे दुचाकीवर लिफ्ट मागून गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरानी पॅण्टच्या खिशात हात घालून खिशातील १ लाख २४ हजार ६०० हजार रुपये चोरून नेले. ही घटना एसबीआय बँक खंदक नाला शाखा येथे मंगळवारी (दि.२५) साडे दहा ते साडे अकरा वाजल्याच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की,समिर अकबर रंगरेज (३६) धंदा – शेळीपालन व भंगार व्यावसाय रा. येवला नाका, मंगळवारी स्टेट बँक शाखा खंडक नाला येथे भरणा करण्यासाठी गेलो असता तुम्हाला दंगलीतील मुख्य शाखेतून ही रक्कम भरावी लागेल अशी माहिती कॅशियर ने दिल्यानंतर गोदाम गल्लीतील मुख्य शाखेत भरणा करण्यास जात असताना माझ्या मागे असलेल्या अनोळखी इसमाने मलासुद्धा गोदाम गल्लीतील स्टेट बँकेत भरणा करायचा आहे. पण मला बँक माहित नाही. म्हणून मला तुमच्या बरोबर येऊ द्या, असे म्हणून तो व त्याचा मित्र माझ्या ॲक्टिवा गाडीवर बसले त्यांनी मला गाडी साई कॉर्नर कडे घेण्यास सांगितले. तिकडे गेल्यानंतर गाडी थांबविण्यास सांगितले. यावेळी माझ्या मागे बसलेल्या त्या अज्ञात चोरटयाने माझ्या पँटच्या खिशात हात घालून बळजबरीने आतील १ लाख २४ हजार सहाशे रुपये यात पाचशेच्या २४९ नोटा व शंभराची एक नोट अशी रक्कम काढून घेतली व गाडीवरून उतरून ते दोघे पळू लागले मी गाडी घेऊन त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते मला काही मिळून आले नाही अशी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी
समिर अकबर रंगरेज यांच्या फिर्यादिवरून भादंविक ३९२ प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.स.ई. बी. सी. नागरे हे करीत आहेत.