कोपरगाव एका बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला
कोपरगाव
मंगळवारी (३०जून) पहाटे पासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह गोदावरी उजव्या कालव्यात मिळाल्याने ही आत्महत्या, की घातपात याचा तपास कोपरगाव पोलिसांकडून सुरू आहे.
जयवंताबाई भाऊराव भोंगळ (वय ६५) कोळपेवाडी असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह आढळला दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास शहाजापूर शिवारातील उजव्या गोदावरी कालव्यात, आढळून आला. त्या मंगळवार (३०जून)
पहाटेपासून पासून बेपत्ता होत्या. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून पोलीस पंचनामा करीत आहेत.
गोदावरी उजवा कालव्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.