आमदार आशुतोष काळेंनी झापल्यानंतर गायत्री ठेकेदार वठणीवर
To the power lines of the Samrudhi Road crossing
समृध्दी रोड क्रॉसिंगच्या वीज वाहिन्यांना जाड आवरण टाकण्याचे काम सुरू
वृत्तवेध ऑनलाईन। 3 Sep 2020,
By :Rajendra Salkar, 16.31
कोपरगाव : आमदार आशुतोष काळे यांनी झापल्यानंतर आज (४ सप्टेंबर) रोजी ठेकेदाराने जमिनीखाली गाडलेल्या विद्युत वाहिन्या बाहेर काढून रोड क्रॉसिंग करताना योग्य पद्धतीने विद्युत वाहिन्या पसरविण्यासाठी जाड आवरणाच्या पाइपाचा वापर करून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू झाले.
वीणा वेष्ठण भूमिगत वीजवाहिन्या जमिनीखाली टाकल्याचे निदर्शनास येताच नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक थांबवा. अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी (२८ ऑगस्ट) रोजी घेतलेल्या बैठकीत सबंधित ठेकेदार, समृद्धी महामार्गाचे अधिकारी, महावितरण व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची पोलखोल करून चांगलीच खरडपट्टी काढली होती.
योग्य प्रकारे काम झाले पाहिजे. ज्या ठिकाणी रोड क्रॉसिंग आहे त्याठिकाणी जाड आवरणाचे पाईप टाकून त्यातून विद्युत वाहिन्या केबल टाका आणि त्यानंतरच खड्डे बुजवा असे अशी कडक भूमिका आमदार काळे यांनी घेतली होती.
या सर्व वीज वाहिन्यांना वेष्ठण टाकण्यात आल्यामुळे भविष्यात या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.