शिरसगावात आर्सेनिक अल्बम- ३० गोळ्यांचे वाटपवाटप- केशव भवर
श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कुलचा उपक्रम
वृत्तवेध ऑनलाईन । 2 Sep 2020
By: Rajendra Salkar 19.20
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कुल तर्फे एल. के.जी ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या शरीरात प्रवेश करू नये म्हणून म्हणून आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. शाळेत जास्त गर्दी होवू नये.व सोशल डिस्टिंगचे पुरेपूर नियम पाळले जावे म्हणून दररोज एक एक वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.
तसेच श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कुलचे संस्थापक केशवराव भवर यांनी या रोगप्रतिकारक गोळ्यांचे महत्व पटवून सांगितले म्हणाले की दररोज सकाळी उपाशी पोटी ४ गोळ्या सलग तीन दिवस घेणे.यानंतर प्रत्येक आठवड्याला ४ गोळ्या एकावेळी घेणे. गोळ्यांना हात न लावता झाकणात घेऊन तोंडात टाकाव्या.गोळ्या चघळून खाव्यात. गोळ्या घेतल्यानंतर ३० मिनिटे काहीच खावू पीऊं नये.
गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाही.अश्या प्रकारे गोळ्या घेण्याची पद्धत समजावून सांगितली.
एका विद्यार्थ्यांचे पालक व्यंकटेश धट यांनी शाळेस ५ हजार रुपयांची मदत देवू केली.यांचे ही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक केशवराव भवर,संचालक स्वप्निल भवर, प्राचार्य दीपक चौधरी. पत्रकार अमोल गायकवाड,विद्यार्थ्यांचे पालक प्रतिनिधीक स्वरूपात उपस्थित होते.