श्री राम मंदिर निर्माण कार्यास १०१ किलो तांबे धातु दान- सुमित कोल्हे
श्री राम मंदिर न्यास आव्हानाला कोल्हे परिवाराचा प्रतिसाद
वृत्तवेध ऑनलाईन। 3 Sep 2020,
By :Rajendra Salkar, 17.00
कोपरगांवः मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या नगरीतील श्री रामांचे मंदिर निर्माण कार्यास पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते ५ ऑगस्ट रोजी शुभारंभ होवुन हा क्षण एक ऐतिहासिक म्हणुन नोंदविला गेला. श्री राम मंदिर न्यासाने मंदिराच्या बांधकामासाठी तांब्याच्या धातुचे दान करावे असे आवाहन केल आहेे. या आवाहनाला प्रतिसाद देत संपुर्ण कोल्हे परीवाराच्या वतीने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी १०१ किलो तांब्याचा धातु बेलापुर येथिल गोशाळा प्रमुख महेशजी व्यास महाराज यांची भेट घेवुन श्री राम मंदिर कोषाध्यक्ष आचार्य गोविंदगिरीजी महाराज यांचेकडे देण्यासाठी सुपुर्द करण्यासाठी कार्यवाही केली.
अयोध्या जन्मभूमी पुजनानंतर मंदिर निर्माणाचे कार्य जोरात सुरू झाले आहे. मंदिर उभारणी करत असताना वापरल्या जाणाऱ्या दगडांना जोडण्यासाठी तांब्याच्या पट्याांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ इंच लांब व ३ मिलीमिटर जाड आणि ३० मिलिमिटर रूंदीच्या सुमारे १०,००० पट्या वापरल्या जाणार आहेत. मंदिर न्यासाने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार यामुळे कित्येक हजारो वर्षे वातावरणाचा परीणाम होवु नये अशा पध्दतीने मंदिराची रचना करण्यात येणार आहे. यासाठी भारत वासीयांनी एकात्मकतेचे प्रतिक महणुन तांबे धातु दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगांव परीसरातुन इच्छुक भाविकांच्या वतीने किमान एक टन तांबे पाठवण्याचा माणस व्यक्त करून या उपक्रमाची सुरूवात कोल्हे परीवाराच्या वतीने १०१ किलो तांबे देवुन श्री सुमित कोल्हे यांनी केली. यावेळी बेलापुरचे उपसरपंच श्री रवीशेठ खाटोड, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांतजी लढ्ढा उपस्थित होते.
कोटः
‘संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे हे धार्मिक व सामाजीक कार्यात सतत पुढे असतात. त्यांच्याच प्रेरणेतुन आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली माझ्यासह कोल्हे कुटूंबियातील सर्व नवीन पिढी कार्यरत आहे. श्री राम मंदिर निर्माण कार्य हे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असुन आणि भारतीय संस्कृती, विचार आणि आध्यात्म जतन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. म्हणुन इच्छुक भाविकांनी आपल्या क्षमतेनुसार तांबे दान करावे.’ -श्री सुमित कोल्हे