ग्रामसेवक व अधिकाऱ्यांकडून नियम धाब्यावर ; टेंडर फिक्सिंगचे प्रकरण – नितीन पटारे
छावा संघटने कडून कारवाईची मागणी, गटविकास अधिकाऱ्यांची कारवाईची ग्वाही

टेंडर नोटीस प्रमुख दैनिकात छापल्या जात नाही, जाहिरात घोटाळा
वृत्तवेध ऑनलाइन। 3 Sep 2020
By: Rajendra Salkar,
कोपरगाव : कोपरगाव पंचायत समिती टेंडर फिक्सिंगचे प्रकरण समोर आले असून विशिष्ट कंत्राटदाराला कामाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून निविदेत तशा अटी घातल्या आहेत. चांदेकसारे येथील १४ वित्त आयोगातील बंदिस्त पाईपलाईन गटारीच्या कामाच्य़ा निविदा प्रक्रियेत हा सर्व घोळ झाला असून याप्रकरणी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी तक्रारीचे निवेदन देताच गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशी करणार असल्याची ग्वाही,
ठराविक कंत्राटदारांच्याच तुमड्या भरल्या जात असल्याचं समोर आलं आहे. पंचायत समिती अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतातून आतापर्यंत अनेक गैरव्यवहारांनी आकार घेतला आहे. ठराविक कंत्राटदारांना काम मिळावे यासाठी थेट टेंडरच फिक्स होत आहे. चांदेकसारे येथील १४ वित्त आयोगातून बंदिस्त पाईपलाईन गटार कामाची निविदा काढली. ज्यामध्ये ग्रामसेवक व अधिकाऱ्यानं तालुका मर्यादित हि परस्पर एक जादा अट टाकली.
कोणत्याही शासकीय पत्रकाचा आधार न घेता मनमानी अटी टाकणे, निविदा खाजगी ठिकाणी प्रसिद्ध करणे ई निविदांमध्ये सर्रास हस्तक्षेप चा प्रकार आपल्याकडे सुरू झाले आहे , साप्ताहिक का मध्ये टेंडर प्रसिद्ध करणे, सर्व तपशील दिला असतानाही नमुना सादर करण्याचा आग्रह का? तसंच हे नमुने पाहून पास की नापास ठरवण्याचे निकष कोणते ? याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे एका ठराविक कंत्राटदाराच्या घशात काम घालायचं.
टेंडर फिक्सिंगचा हा मुद्दा छावा संघटनेने समोर आणल्यानंतर अनेक कंत्राटदारांनी याप्रकरणी तक्रार केली.
या टेंडर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आवाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील यांनी केली आहे.
चौकशीचं पंचायत समिती गट अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी आश्वासन दिलं आहे. पण ही चौकशी खरंच होते का आणि कधी होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चौकशीचे निवेदन गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना देताना जिल्हाध्यक्ष छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील तालुका अध्यक्ष परिमल दवंगे ,तालुका कार्य अध्यक्ष रवींद्र उगले,तालुका विद्यार्थी योगेश दवंगे ,वैभव दवंगे, कामगार आघाडी प्रमुख अनिल हिरवडे, प्रवीण काळे ,तालुकाअध्यक्ष राहताअतुल चौधरी,जिल्हा सरचिटणीस प्रवीणनाना देवकर, जिल्हासंपर्कप्रमुख विरेश बोठे,आदी उपस्थित होते.
टेंडर नोटीस प्रमुख दैनिकात छापल्या जात नाही, लाखोचा जाहिरात घोटाळा लवकरच समोर आणणार





