पीपल्स बँकेच्या गणेश मंडळाची सामाजिक बांधिलकी ! कोरोना योध्दयांना पीपीई किटचे वाटप

पीपल्स बँकेच्या गणेश मंडळाची सामाजिक बांधिलकी ! कोरोना योध्दयांना पीपीई किटचे वाटप

वृत्तवेध ऑनलाइन। 4 Sep 2020
By: Rajendra Salkar, 10.30

कोपरगाव : कोपरगाव पीपल्स बँकेच्या गणेश उत्सव मंडळाने कोपरगाव शहरातील खरे कोरोना योध्दे यांना पीपीई किटचे (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट) वाटप केले. यामुळे कोविड सेंटर व शहरी भागातील डॉक्टरांना व अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला असून करोनाबाधितांवर उपचार योग्य पद्धतीने होऊ शकतील, असे मानले जात आहे.

याबद्दल माहिती देताना पीपल्स बॅंकेचे चेअरमन अतुल काले म्हणाले, शहरातील कोविड सेंटर तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांना तसेच तहसीलदार यांना पीपीई किट पिपल्स बँक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून देण्यात आले. करोनाबाधितांवर उपचारासाठी डॉक्टरांना याची गरज भासत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना कोविड सेंटर कोपरगाव येथे
तहसीलदार योगेश चंद्रे, डॉ. कृष्णा फुलसौंदर व डॉ. वैशाली बडदे यांचेकडे पी. पी. इ किट व आरोग्यविषयक साधनांची मदत देण्यात आली.

यावेळी कोपरगाव पीपल्स बँकेचे चेअरमन अतुल काले, असिस्टंट जनरल मॅनेजर जे.पी.छाजेड, मंडळाचे अध्यक्ष सि. एन. व्यास, व्हि. एच. रोठे, व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page