पोहेगाव पतसंस्थेची तीन दशकात ठेवींची शतकी पार – – नितीन औताडे
वृत्तवेध ऑनलाइन। 4 Sep 2020
By: Rajendra Salkar, 10.35
By: Rajendra Salkar, 10.35
कोपरगाव : अहमदनगर जिल्हा पतसंस्थेच्या चळवळीत अग्रस्थानी असलेल्या पोहेगाव नागरी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात १०० कोटी ठेवींचा टप्पा पार करत ठेवींचा वाढीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला आहे. सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतकांच्या जोरावर संस्थेने पारदर्शक व विश्वासपूर्ण व्यवहाराची परंपरा जपल्यानेच पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या ठेवी शंभर कोटीच्या पुढे गेल्या असल्याची माहिती पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक शिवसेना नेते नितीन औताडे यांनी दिली आहे.
सन १९९० साली केवळ ३६ हजार रुपयांच्या भागभांडवलावर पतसंस्थेचा शुभारंभ झाला होता.
आज रोजी संस्थेचे एकूण भाग भांडवल १ कोटी ४५ लाख ६३ हजार १२७ रुपये इतके असून ठेवी १०० कोटी ९ लाख ३८ हजार ७९० रुपये झालेल्या आहेत.संस्थेचे कर्जवाटप ६४ कोटी ६२ लाख ६ हजार ३५५ रुपये असून गुंतवणूक ४५ कोटी ४९ लाख १९ हजार ८७० व स्वनिधी ७ कोटी ९२ लाख १८ हजार ८९४ इतके असून संस्था स्थापनेपासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या छुप्या कपाती संस्थेत केल्या जात नसल्याचे औताडे यांनी सांगितले.संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, उपाध्यक्ष विलासराव रत्ने, संचालक रमेशराव झांबरे,संस्थेचे सर व्यवस्थापक सुभाष औताडे ,व्यवस्थापक विठ्ठल घारे, रमेश हेगडमळ ,सोमनाथ मोजड, कर्मचारी, प्रतिनिधी यांच्या सहकार्याने संस्थेने शिर्डी व कोपरगाव शहरात संस्थेच्या शाखा स्थापन करून विस्तार वाढवला.प्रत्येक खातेदाराला व्यवहाराची माहिती एसएमएस द्वारे उपलब्ध करून देण्यात आली असून संस्थेकडे स्वतःचा आय एफ सी कोड असल्याने देशांतर्गत आरटीजीएस व एनएफटी सुविधा जलदगतीने उपलब्ध झाल्याने ग्राहकांना व्यवहार करण्यास मदत मिळाली. संस्थेने पोहेगाव व कोपरगाव शाखेसाठी सुसज्ज इमारती बांधून स्ट्रॉंगरूम व लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांना ८० टक्के सोनेतारण कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिलेले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या उद्योग, व्यवसाय व युवकांना स्वयंरोजगारासाठी माफक व्याजदरात कर्ज वितरण करून कोपरगाव शहरासह तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न संस्था करणार असल्याची माहितीही नितीनराव औताडे यांनी दिली.
Post Views:
262