डाऊच बुद्रुकला गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह

डाऊच बुद्रुकला गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह

Body found in Godavari river basin

वृत्तवेध ऑनलाइन। 4 Sep 2020
By: Rajendra Salkar, 15.30

कोपरगाव : तालुक्यातील डाऊच बु।। शिवारात अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष पुरुष जातीचे प्रेत सापडले आहे. याबाबतची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला मिळताच सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली.

शुक्रवारी (४ सप्टेंबर) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डाऊच बु।। येथील गोदावरी नदीच्या पाण्यात हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना याबाबत डाऊच बु।। पोलीस पाटील आण्णासाहेब विश्वनाथ कांबळे यांनी शहर पोलीस स्टेशनला खबर दिली.माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. तर हे प्रेत पुरुष जातीचे असल्याची माहिती समोर आली. तसेच मयत पुरुषाचे ३५ ते ४० वर्षे वय असण्याची शक्यता आहे. कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हे प्रेत वाहून आले की काय , या विषयी तपास सुरू आहे. या व्यक्तीचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांचा शोधाशोध सुरू आहे. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी दिली. सदरहू या मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सात ते नउच्या दरम्यान शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी या ठिकाणी भेट देउन माहिती घेतली.

Leave a Reply

You cannot copy content of this page