चांदेकसारेत धुडगूस घालणाऱ्या डुकरांचा ग्रामपंचायतीकडून बंदोबस्त

चांदेकसारेत धुडगूस घालणाऱ्या डुकरांचा ग्रामपंचायतीकडून बंदोबस्त

वृत्तवेध ऑनलाइन। 5 Sep 2020
By: Rajendra Salkar, 14.00

कोपरगाव : गावे हागणदारीमुक्त झाल्याने डुकरांची परवड होत आहे, या परवड झालेल्या डुकरांनी आपला मोर्चा आता या उभ्या पिकातील शेताकडे वळवला आहे याचा प्रत्यय तालुक्यातील चांदेकसारे गावातील शेतकऱ्यांना येत आहे. डुकरांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे, की डुकरांचे हे कळप नागरिकांच्या शेतात शिरून धुडगूस घालत आहे. ही डुकरे इतकी निडर बनली आहेत की, हल्ल्याचा देखील प्रयत्न करित आहेत.

चांदेकसारे येथे डुकरांची संख्या वाढलेली होती.ही डुकरे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करत होते. नागरिकांनी ग्रामपंचायतीला विनंती केल्यानंतर ग्रामपंचायतीने संबंधित डुकरांच्या मालकांना विश्वासात घेऊन चांदेकसारे ग्रामपंचायतीने ही डुकरे पकडून त्यांच्या ताब्यात दिली.सध्या चांदेकसारे परिसरात ऊस मका सोयाबीन भाजीपाल्या सह अन्य पिके उभी आहेत. गावात असलेली डुकरे अन्न शोधायच्या नादात याा पिकांची नासाडी करत होती. अनेक शेतकऱ्यांनी या डुकरांच्या या मालकांना भ्रमणध्वनीवरून फोन करून हे डुकरे पिकांची नुकसान करत असल्याची माहिती दिली. संबंधित डुकरांच्या मालकांनी ही काही प्रमाणात ही डुकरे पकडून नेली. मात्र डुकरांचा जनन दर जास्त असल्याने डुकरांची संख्या मात्र झपाट्याने चांदेकसारेत वाढली गेली. पूर्वी घराघरात शौचालय नसल्यामुळे डुकरांचा उपयोग होत होता. मात्र आता संपूर्ण गावे हागणदारीमुक्त झाली. त्यामुळे आता ही डुकरे फक्त नुकसानी पुरतेच मर्यादित राहिली आहे.गावातील ग्रामस्थांनी माजी सरपंच केशवराव होन यांच्याकडे या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली त्यांनी तात्काळ याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच पूनम खरात, उपसरपंच विजय होन यांना सूचना केल्या कि डुकरांचा बंदोबस्त केला पाहिजे.ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेत डुकरांच्या मालकांना बोलावून घेतले व सदर डुकरे त्यांच्या ताब्यात वाहनाच्या साह्याने पकडून दिली.पकडण्यासाठी डुकरे चपळ असल्यामुळे काही प्रमाणात डुकरे अजून गावातच आहे मात्र सर्व डुकरांचा बंदोबस्त केला जाईल असे उपसरपंच विजय होन यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page