कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा – ॲड .बाळासाहेब कडू
Bad road conditions
वृत्तवेध ऑनलाइन। 6 Sep 2020
By: Rajendra Salkar, 17.17
By: Rajendra Salkar, 17.17
कोपरगाव नगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे त्वरित सुरू करून शहरातील जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. बाळासाहेब कडू यांनी पत्रकाद्वारे मुख्याधिकारी कोपरगाव नगरपालिका यांच्याकडे केली आहे.
गेल्या चार पाच वर्षापासून कोपरगाव शहरातील प्रमुख प्रमुख रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले असूनत्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .गेल्या चार पाच वर्षापासून कोपरगावातील शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, रस्ते नादुरुस्त असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे .
कोपरगाव नगरपालिका निधीअभावी प्रमुख रस्त्याचे कामे करू शकत नव्हते परंतु आता कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आमदार आशितोष काळे यांनी कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी 14 वित्त आयोगाकडून सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल कोपरगाव शहरातील शहरातील जनतेच्या वतीने आमदार काळे यांचे ॲड.बाळासाहेब कडू यांनी जाहीर अभिनंदन केले आहे , आता कोपरगाव नगरपालिकेने कोणताही विलंब न करता शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे त्वरित हाती घेऊन जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी ॲड . बाळासाहेब कडू यांनी कोपरगाव नगरपालिकेकडे पत्रकाद्वारे केली आहे .
Post Views:
375