कोपरगाव शिवसेना शहरप्रमुख पदी कलविंदर दडियाल यांची नियुक्ती
वृत्तवेध ऑनलाईन। Fir11Sep20
By : Rajendra Salkar, 8.00
कोपरगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी निष्ठावान कार्यकर्ते उपशहरप्रमुख कलविंदर दडियाल यांची नियुक्ती शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, यांनी केली आहे अशी माहिती नगर उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरात शिवसेना घराघरात नेणार असून, मजबूत बांधणी करणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे,’ अशी प्रतिक्रिया नियुक्ती नंतर कलविंदर दडियाल यांनी व्यक्त केली.
कलविंदर दडियाल यांची शिवसेना कोपरगाव शहरप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे खासदार सदाशिव लोखंडे , जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अभिनंदन केले.