सकल मराठा समाज, कोपरगांवच्या वतीने निवेदन – सुमित कोल्हे
‘मराठा आरक्षण स्थगिती’ सुनावणी जलद गतीने राबवावी
वृत्तवेध ऑनलाईन। Fir 11Sep 2020
By : Rajendra Salkar, 14.00
कोपरगांवः ‘माननिय सर्वाेच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेम्बर रोजी दिलेल्या आदेशान्वये मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी घटनापिठाकडे वर्ग केली आहे. घटना पिठाने आरक्षणाबाबतची सुनावणी लवकरात लवकर व सलग घेवुन यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी सरकारने योग्य ती यंत्रणा उभी करून सुनावणीचा पाठपुरावा करावा’, अशा आशयाचे निवेदन युवा कार्यकर्ते श्री सुमित कोल्हे यांनी सकल मराठा समाज, कोपरगांव यांच्यावतीने कार्यकर्यांसह नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी यांचेकडे गुरूवारी (दि. १० सप्टेम्बर) सूपुर्द केले.
सदर प्रसंगी भरत मोरे, अनिल गायकवाड, विजय वाजे, कृष्णा आढाव, अशोक आव्हाटे, स्वप्नील निखाडे, बाळासाहेब आढाव, विजय आढाव, रवी रोहमारे, दिनेश पवार, अमोल भाकरे, स्वप्नील औताडे, आदी कोविड १९ चे मार्गदर्शक तत्वे पाळुन उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की जोपर्यंत घटनापिठाची सुनावणी पुर्ण होत नाही तो पर्यंत आरक्षण निर्णय स्थगित होवुन नोकरी व शिक्षण यामध्ये मराठा समाजास आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्यामुळे आधीच हलाखीच्या परीस्थितीत असणाऱ्या मराठा समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी शासनाने जलद सुनावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून पाठपुरावा करावा, जेणे करून युवक वर्गाचे शैक्षणिक व नोकरीत होणारे नुकसान टळून मराठा समाजास योग्य तो न्याय मिळेल.
यावेळी श्री कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या की सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात तत्कालीन महाराष्ट्र सरकारने १ डिसेंबर, २०१८ पासुन राज्यात मराठा आरक्षण लागु केले. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाजाने मोठा त्याग केला आहे. अनेकांना स्वतःचे आयुष्य आरक्षणासाठी संपविले. आता कुठे या या आरक्षणाच्या मिमित्ताने दिलासा मिळत असताना पुन्हा याला स्थगिती मिळाली. मात्र न्याय देवता मराठा समाजाच्या बाजुने सर्व बाजु तपासुन कौल देईल, असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.