शहरातील पोस्ट ऑफिसमागे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस पलिकेची परवानगी – सतिष काकडे
वृत्तवेध ऑनलाईन। Fir11Sep2020
By : Rajendra Salkar, 14.00
कोपरगाव : कोपरगाव शहर म्हणजेच या मागणीला यश आले असून नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शहरातील पोस्ट ऑफिसमागील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस परवानगी दिली असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष सतिष काकडे यांनी दिली आहे.
शहरात शेतकरी व व्यापारी यांना भाजीपाला खरेदी विक्रीसाठी नेहरु भाजी मार्केट येथे तसेच बाजारतळ येथील राघोजी भाजी मार्केट तयार करुन देखील जागा पुरत नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये अनेकवेळा वाद होतात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना बैलबाजार या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे. परंतु तेथे असणाऱ्या जनावरांच्या बाजारामुळे तेथे अस्वछ्ता आहे. त्यामुळे नागरिक तेथे खरेदीसाठी येत नाही व शेतकऱ्यांना रोगराईचा सामना करावा लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठीकाणी भाजीपाला विक्री करण्याची परवानगी शेतकरी अनेक दिवसा पासुन करत होते. त्यासाठी कोपरगाव मनसेचे शहराध्यक्ष् सतिष काकडे यांच्या नेतृत्वात कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन तहसील कचेरी जवळीतील व पोस्ट ऑफिसच्या मागील जागेत शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीची परवानगी घेण्यात आली.
या निवेदनावर शहराध्यध सतिष काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, रघुनाथ मोहिते बंटी सपकाळ ,नितिन त्रिभुवन,आलिम शहा जावेदभाई ,शेख सचिन खैरे, आंनद परदेशी, संजय जाधव, बापू काकडे, नवनाथ मोहिते यांच्या सह्या आहेत.