कोरोना विषाणू माणसासाठीच नव्हे तर आजारासाठीही घातक ; साथीचे आजार केले हद्दपार

कोरोना विषाणू माणसासाठीच नव्हे तर आजारासाठीही घातक ; साथीचे आजार केले हद्दपार

मेडिसीनला लगाम, तर आयुर्वेदाला ऊजाळा ! प्रदूषणाला अटकाव, वातावरणाचे शुद्धीकरण !!

वृत्तवेध ऑनलाईन। Fir11Sep 2020
By : Rajendra Salkar, 16.00

 

कोपरगाव : पावसाळी वातावरण म्हटले की, “सर आली धावून आजार गेली टाकून” साथीच्या रोगाचे थैमान हे ठरलेले गणित परंतु यावर्षी माणसांसाठी घातक ठरलेल्या कोरोना विषाणूने साथीचे आजारांनाही हद्दपार करून टाकल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

पावसाळी वातावरणात हवामान बदल काळात गेल्या चार पाच वर्षातील कोपरगावकरांच्या व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी वर नजर टाकली तर असे दिसून येईल की या वर्षात सातत्याने चिकनगुनिया, माकड ताप, मलेरिया, डेंगू, पांढऱ्या पेशी कमी होणे या आजारांनी थैमान घातल्याचे दिसून येईल. पण  यावर्षी कोरोनाच्या भितीने यापैकी कोणताच आजार दिसून आला नाही. हे विशेष ! म्हणजे कोरोना विषाणू हा फक्त माणसासाठी नव्हे तर आजारासाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण दर साल पावसाळी  वातावरण व हवामान बदलाच्या वेळेस साथीच्या आजाराने थैमान घातल्याचे सातत्याने दिसून आले आहे. कोपरगावकरांनी बाल रुग्णालय ते मोठमोठाली रुग्णालये साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येने तुडूंब भरलेली  पाहिलेली व अनुभवलेली आहेत. विशेष म्हणजे दरवेळी एक वेगळाच आजार झालेला दिसून येत होता. त्या मानाने कोरोना रुग्णांची संख्या फारच कमी आहे. एकतर पावसाळी वातावरण त्यात सर्दी-पडसे पाठोपाठ येणारा ताप हीच तर कोरोनाची लक्षणे असल्यामुळे ज्यांना साधी सर्दी पडसे झाले त्यांची गणती ही कोरोना बाधितामध्ये केली जात असल्याने हे आकडे थोडे वाढल्यासारखे दिसत आहे. बाकी काही नाही. विशेष म्हणजे यापूर्वी त्रास होणारे रुग्ण आपल्या सोयीनुसार दवाखान्यात ऍडमिट होऊन उपचार घेत असत त्याचा गाजावाजा होत नव्हता व त्याची आकडेवारी काही कोणी देत घेत नव्हते. प्रत्यक्षात तशी जर गणती केली असती तर ती संख्या फारच मोठ्या प्रमाणात आले असती, त्यामुळे रुग्णसंख्या समजण्याचा प्रश्नच नव्हता मात्र आज प्रत्येक आल्या गेल्या रुग्णाची गणती केली जात असल्यामुळे आपल्याला आकडे दिसत आहे. एक तर संपूर्ण जगात कोरोना ने थैमान घातल्याने एक वेगळीच भीती प्रत्येकाच्या मनात आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने सगळ्यांचे लक्ष आकडेवारीकडे केंद्रित झाले आहे. त्यामुळे हा सर्व आकड्यांचा खेळ जरी असला तरी तो अगदीच नगण्य आहे.
कोरोनावर आज जगात कुठलीही लस व उपचार अजून निघालेला नाही. हे जगजाहीर असताना सुद्धा  लोक कोरोना मुक्त होतात.  हे तर सर्वांना मान्य करावे लागेल. सर्व सुरळीत चालू आहे. मग घाबरायचे कशाला ?इतर आजारांप्रमाणे तोही एक आजार आहे. असे समजा त्यासाठी थोडीशी विश्रांती घ्या, थोडासा उपचार करा, थोडीशी सावधगिरी बाळगा, मोठ्याप्रमाणात स्वच्छता ठेवा, तोंडाला मास्क लावा  या सर्व गोष्टींची काळजी घेतली ,तर कोरोना होऊ शकत नाही. किंवा झाला तरी तो पण बरा होऊ शकतो याची मनाशी पूर्ण खूणगाठ बांधा हे आता जवळपास सिद्ध झाले आहे.
कोरोना विषाणू माणसासाठीच नव्हे तर आजारासाठीही घातक ठरला असून साथीचे आजार हद्दपार झाले आहेत. पर्यावरणाला काळापासून वातावरण शुद्ध झाले आहे. लोकांचे हौस मौजे कडून आरोग्याकडे लक्ष गेले आहे, जो तो स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ लागला आहे. आहार विहार आणि व्यायाम कडे लक्ष देऊ लागला आहे. सामाजिक   डिस्टन्समुळे रिकामटेकड्या उचापत्या कमी झाल्या आहेत. वाद-विवाद संपुष्टात आले आहेत. ज्यांना कधी वेळ मिळत नव्हता त्यांच्याकडे आता वेळच वेळ आहे. घड्याळाच्या काट्यावर पळण्याची स्पर्धा कमी झाली आहे. ऊठसूट दवाखान्यात जाण्याची परिस्थिती बदलली आहे. यामुळे मेडिसीनला लगाम बसला असून आयुर्वेदाला ऊजाळा मिळाला आहे. हे लोकांचे हम्युनिटी  पावर वाढल्याचे लक्षण असल्याचे म्हणावे लागेल.  पूर्वी कोणत्याही आजारासाठी घरगुती उपाय म्हणून आजीचा बटवा असायचा तो आता घरातल्या प्रत्येकाचाच बटवा बनला आहे. सगळे कसे स्वच्छ झाला आहे तेव्हा स्वतः घाबरू नका, दुसऱ्यांना घाबरवू नका, कोरोना ने पॉझिटिव्ह होण्यापेक्षा विचाराने पॉझिटीव्ह  व्हा,
आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,धंदा पाणी नोकरी व्यवस्थित करा, स्वस्त राहा, मजेत राहा, बस एवढेच ! सल्ला नव्हे लढाई जिंकायची आहे, त्या साठी हा छोटासा प्रयत्न!

परंतु काही लोकांनी याला गंभीर स्वरूप घेऊन लोकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तो त्यांनी थांबवावा असे आवाहन सातत्याने महसूल पोलीस पालिका व आरोग्य प्रशासन करीत आहे. याची आठवण ठेवा !

आपली प्रतिक्रिया

Leave a Reply

You cannot copy content of this page