दिलासादायक कोपरगाव करोनामुक्तीचे प्रमाण ९० टक्कयाकडे
वृत्तवेध ऑनलाईन। Fir11Sep 2020
By : Rajendra Salkar, 18.00
कोपरगाव : करोनाबाधितांचे आजारातून मुक्त होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. सध्या ८९ .८८ टक्के करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण टक्क्यांवर पोचले आहे. वाढत्या रुग्णसंख्येची धास्ती घेतलेल्या कोपरगावकरांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. महिन्यांपूर्वी २ टक्क्यांच्या घरात असलेला मृत्यूदर देखील आता १.७७ टक्क्यांवर आला आहे.
कोपरगाव शहरात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. पावसाळी व दमट वातावरणात रुग्ण वाढत असले तरी त्याचेप्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये स्थिर असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदवले आहे. रुग्णवाढीच्या प्रमाणाबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील काही दिवसांमध्ये वाढले आहे.
ग्राहक कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदरकडून मिळालेल्या माहितीनुसार; ११ सप्टेंबर रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८८ टक्क्यांवर पोचले होते. गेल्या काही महिन्यांतला रुग्ण बरे होणाच्या हा सर्वोच्च दर मानला जात आहे. हा शहरवासीयांच्या दृष्टीने तो एक दिलासा असल्याचे मानले जात आहे. करोना आजारामुळे ७ महिन्यात मरणपावणाऱ्यांची एकुन संख्या आता २१ झाली असून . मृत्यूदर १.७७ टक्क्यांवर आल्याची माहिती देखील कोविड सेंटरमधील ११ सप्टेंबरच्या अहवालानुसार मिळाली आहे. दहा लाख लोकसंख्येमागे करोना चाचण्या देखील आता २० हजार २३६ वर पोचल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण २३.४४ टक्के असून आत्तापर्यंत ११८६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून १०६६ जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. कोविड सेंटरमध्ये केवळ केवळ ९९ रुग्ण उपचार घेत आहेत.
परंतु काही लोकांनी याला गंभीर स्वरूप घेऊन लोकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तो त्यांनी थांबवावा असे आवाहन सातत्याने महसूल पोलीस पालिका व आरोग्य प्रशासन करीत आहे. तेंव्हा नागरिकांमध्ये घबराट निर्माण होईल असे कोणतेही वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ नये. वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच मगच आपले मनोगत द्यावे असेही डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.