चांदेकसारे ग्रामपंचायत अंत्यविधीचे सरणाचा खर्च उचलणार – केशव होन

चांदेकसारे ग्रामपंचायत अंत्यविधीचे सरणाचा खर्च उचलणार – केशव होन

एक वृक्ष लावून आठवण जपणार

वृत्तवेध ऑनलाईन।Sat12 Sep2020
By : Rajendra Salkar, 18.30

कोपरगाव : परिसरात निधन झालेल्या कोणत्याही व्यक्तींचा अंत्यविधीचे सरणाचा खर्च चांदेकसारे ग्रामपंचायत उचलणार असून एक वृक्ष लावून मयत व्यक्तीची आठवण जपणार असल्याची माहिती माजी सरपंच केशवराव होन यांनी दिली.

यासंदर्भात केशवराव होन यांनी ग्रामसभेत सूचना मांडली होती. त्या सूचनेला सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर व सदस्यांनी
सर्वानुमते संमती देण्यात आल्याने हा ठराव नुकताच ग्रामपंचायतीत मंजूर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना केशवराव होत म्हणाले, समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी दरी असून त्यांना दोन वेळचे जेवणही मिळणे कठीण असते. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्या व्यक्तीच्या अंत्यविधी साठी देखील
पैसा उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा व्यक्तींची मोठी हेळसांड होते. आपल्याच गावातील अशा कोणत्याही व्यक्तीवर ही वेळ येऊ नये म्हणून सरसकट गावातील कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या पार्थिवाला अग्नि दहनासाठी लागणाऱ्या सारणाचा खर्च ग्रामपंचायत करणार आहे. रक्षा नदीत विसर्जन न करता, ती रक्षा घराच्या बाजूला किंवा शेतात टाकून त्या व्यक्तीच्या व्यक्तीची आठवण जपण्यासाठी एक वृक्ष लावून जोपासना करण्यात येणार असल्याचे सरपंच पुनम खरात व उपसरपंच विजय होन यांनी जाहीर केले.

तालुक्यातील हा निर्णय घेणारी चांदेकसारे ग्रामपंचायत पहिलीच असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे चांदेकसारे पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page