कोपरगावच्या रुग्णासाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये  बेड आरक्षित ठेवा – आ. आशुतोष काळे

कोपरगावच्या रुग्णासाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये  बेड आरक्षित ठेवा – आ. आशुतोष काळे

वृत्तवेध ऑनलाईन।Sun13 Sep20
By : Rajendra Salkar, 15.30

कोपरगाव :  श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी  साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. एच. बगाटे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत केली आहे.

 कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आजपर्यंत वीस रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या  कोविड केअर  सेंटरवर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे  कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवल्यास रुग्णांवर वेळेत उपचार होवून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे  व कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी आय. सी. एम. आर. कडे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली असून सदर 3 मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी बाबासाहेब घोरपडे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page