गायत्री कंपनीचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान शेती नापीक होण्याची भीती
ठेकेदाराकडून ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
वृत्तवेध ऑनलाईन।Sun13 Sep20
By : Rajendra Salkar, 16.00
कोपरगाव : दोन दिवसांच्या पावसाने रस्त्यावरील भरती वाहून शेतात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली असून वारंवार भराव दाबण्याच्या ग्रामसभेच्या ठरावाला गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून जो काही हलगर्जीपणा केलात्यामुळेच आजची ही परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला दिला आहे .
कोकणठाण परिसरात गुरुवार व शुक्रवारी पाऊस झाला या पावसामुळे समृद्धी महामार्गासाठी टाकलेला मातीचा भराव वाहून पुणतांबा महामार्ग व समृद्धी महामार्गाचा जेथे मिलाफ होतो त्या परिसरात सर्वे नंबर २६६ मध्ये बाळासाहेब भाऊराव थोरात यांची सहा एकर जमीन समृद्धी महामार्गाच्या कामावर टाकलेल्या मुरूम मिश्रीत खळगा वाहून आलेल्या त्यांची संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली . आठ पाईली कांदा रोप अक्षरशः सडुन गेले जवळपास एक लाख रुपये कांदा उळे घेण्यासाठी त्यांना खर्च आला होता. तर चार एकर सोयाबीन उपळून गेली व भुईमूग ही अर्धा एकर जमीनदोस्त असे जवळपास त्यांचे सात लाखाच्या वरती नुकसान झाले आहे.
तर संजय एकनाथ थोरात ,एकनाथ मारुती थोरात, विजय आप्पासाहेब दाभाडे, संदीप भास्कर दाभाडे अदी समृद्धी महामार्गाच्या रोड लगत असलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन मका बाजरी आदी पिके या वाहून आलेल्या खळग्याने खराब झाले. संपूर्ण पिकांची नुकसान झाली. वाहून आलेल्या खळग्याने झालेल्या नुकसानीची माहिती गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी दिली. अधिकारी परिस्थिती पाहण्यासाठी आले मात्र अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा तोडगा न काढता काढता पाय घेतला. या समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना या शेतकऱ्यांनी कोकमठाण येथे ग्रामसभा घेऊन सदर भराव दाबण्यासाठी गायत्री कंपनीला लेखी निवेदन दिले होते मात्र तसे न झाल्यामुळेच सदर खळगा शेतकऱ्यांच्या जमिनीत वाहुन आला आणि हे नुकसान झाले आहे.सदर परिस्थितीची पाहणी प्रशासनाने करून या सर्व बाबीला गायत्री कंपनीला जबाबदार धरून शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.