क्रीडांगण आरक्षण सोडण्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष व प्रशासन कायदेशीर एकवटले काय ? – संजय काळे
क्रीडांगणाच्या जागा खरेदीसाठी पालिकेची अनास्था,
शहरातील ३५ हजार लोकांनी प्रत्येकी शंभर रुपये दिल्यास ३५ लाखांची जागा खरेदी करता येईल.
वृत्तवेध ऑनलाईन। Mon14 Sep20
By: Rajendra Salkar, 16.09
कोपरगाव : कोपरगाव शहरात स नं २०५ मध्ये व स नं २१० मध्ये पोलीस परेड ग्राऊंड व नगरपरिषद चे क्रिडांगण ६५ व ७७ आर म्हणजे गुंठे क्षेत्रात साकारण्यासाठी नगरपरिषदेने आरक्षण टाकलेले आहे. नगरपरिषदेने क्रिडांगण ताब्यात घेण्यासाठी व पोलीसांनी परेड ग्राऊंड ताब्यात घेण्यासाठी कुठलेही प्रयत्न आजवर केलेले नाहीत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला असून क्रीडांगण आरक्षण सोडण्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष व प्रशासन कायदेशीर एकवटले काय ? असा सवालही काळे यांनी केला आहे.
त्यामुळे जमीन मालकाने जमीनीचा मोबदला मिळावा अथवा आरक्षण रद्द करून मिळावे म्हणून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली. नगरपरिषदेला जमीन मालकाला मोबदला देऊन क्रिडांगणाचा ताबा घेण्यासाठी एक वर्षाची मुदत घातली आहे. निकाल लागून जवळ जवळ आठ महिने उलटले पण कोपरगाव नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभेचे सदस्य एक निर्णय घेऊन क्रिडांगण खरेदीची प्रक्रियापुर्ण करण्याचे प्रयत्न का केलेले नाही.
आता पर्यंत मुख्याधिकारी यांनी २७/८/२०१९ ला उच्च न्यायालयाने काय निकाल दिला हे आज अखेर सभागृहाला का अवगत केलेले नाही.
आता १५/९/२०२० ला सर्वसाधारण सभेला विषय क्रमांक २० व २१ वर उच्च न्यायालयाचे निकाल वाचन होणार आहे. निकाल लागून एक वर्ष झाले.स नं २०५ व २१० नगर मनमाड रस्त्यालगत सप्तसरोवर शेजारी येवला नाक्यावर आहे. तेंव्हा हे आरक्षण सोडण्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष व प्रशासन कायदेशीर एकवटले काय .. असाच अंदाज बांधण्याशिवाय पर्याय नाही. कोपरगाव नगरपरिषदला जर हे ६५ आर क्रिडांगण विकत घ्यायचे असेल तर जमीन मालकाला ३५.४२ लाख रूपये मोजावे लागणार आहेत असेही काळे यांनी सांगितले
संजय काळे म्हणाले, कोपरगाव शहरात सामान्य माणसासाठी एक देखील क्रिडांगण नाही.न्यायालयाने दिलेल्या मुदतीत नगरपरिषद क्रिडांगण खरेदी करतात की सगळे मिळून विषय तहकूब करून न्यायालयाने दिलेली मुदत संपवून क्रिडांगण अलगद जमीन मालकाला परत करणार व कमीशन मिळवणार कोण कोण..? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे
संजय काळे म्हणाले पोलीस यंत्रणा न्यायालयात जाणार असे एक वर्षा पासून ऐकतो पण अजून न्यायालयात गेले नाही. कारण त्यांनाच माहीती, बघूया, ते पण राज्यमार्गा शेजारील ७७ आर. गुंठेचे परेड ग्राऊंड आरक्षण होऊ शकतात की नाही. ह्याच ठिकाणी असलेले एस. टी. चे आरक्षण सुमडीत रद्द करून देणारी नगरपालिका सत्कारास पात्र आहे. सगळे मिल बाट कर खात असल्याचा प्रत्यय रोज येत असल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे.
विजय काळे म्हणाले क्रिडांगण वाचवण्यासाठी नगरपरिषद व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात जनतेने किमान व्यक्त होण्याची गरज आहे. अन्यथा ते दिवस लांब नाहीत जसे एक क्रीडांगण पूर्वेला गेले तर दुसरे पश्चिमेला जाईल तसं नाही त्यांनी यावेळेस लगावला.
ह्या माझ्या देशाच्या लोकशाहीला धोका गुंडांपासून नाही. तर योग्य वेळी व्यक्त न होणाऱ्या साक्षर माणसापासून लोकशाहीला धोका आहे.. त्याचाच फायदा भ्रष्टाचारी घेत आहेत असल्याचा आरोप करून संजय काळे यांनी नागरिकांना सहभाग सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
चौकट
क्रिडांगणाची आरक्षित केलेली जागा खरेदी करण्यासाठी पालिकेने अनास्था दाखविली असली तरी जागा मालकाला पैसे देण्यासाठी घ्यायला तू मुदतवाढ घेऊन सर्वांच्या साथीने व सहभागातून ज्येष्ठांसाठी, मुलांसाठी, भावी पिढीच्या आरोग्यासाठी स्वतःच्या हक्काचे क्रीडांगण मिळविण्यासाठी कोपरगाव शहरातील ३५ हजार लोकांनी प्रत्येकी शंभर रुपये नगरपालिकेला दिले तर ३५ लाखाची क्रीडांगणासाठी आरक्षित असलेली नगर-मनमाड महामार्गावरील जागा खरेदी करणे काहीच अवघड नाही. असे इति – संजय काळे ,