कोपरगाव नगरपालिकेच्या ऑनलाइन सभेला सेना – भाजपा नगरसेवकांचा आक्षेप, ठरावांनाही विरोध
कोरम पूर्ण म्हणत सभा उरकली, विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष
वृत्तवेध ऑनलाईन | Mon15 Sep20,
By:Rajendra Salkar, 20.00
कोपरगाव : तालुक्यात नेटवर्कची सुविधा तितकीशी चांगली नाही. आज सभा सुरू असताना दोनदा संपर्क तुटल्याने सभेत कोणत्या विषयावर काय चर्चा झाली हे समजु शकलेले नाही.असे म्हणत येथील नगरपालिकेत आज झालेल्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेला सेना भाजपा नगरसेवकांनी आक्षेप घेतला. सभा सुरू असताना दोनदा संपर्क तुटला. त्यामुळे सभेत नेमकेपणाने कोणती चर्चा झाली हे समजु शकले नाही. त्यामुळे आजच्या सभेत झालेल्या ठरावांना देखील त्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.
येथील नगरपालिकेची मंगळवारी (सप्टेंबर १५ ) रोजीची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या सभेला सेना ५ , भाजपा १५ नगरसेवक यांनी नगराध्यक्षांकडे आक्षेप नोंदविला. तालुक्यात नेटवर्कची सुविधा तितकीशी चांगली नाही. आज सभा सुरू असताना दोनदा संपर्क तुटल्याने सभेत कोणत्या विषयावर काय चर्चा झाली हे समजु शकलेले नाही. त्यामुळे आजच्या सभेत झालेल्या ठरावांना आपला विरोध राहणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभा सोशल डिस्टन्सिंग पाळुन घेतल्या जातात. त्याचप्रमाणे नगरपालिकेची सभा देखील घेतली जाऊ शकते; मात्र तसे न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेतली गेली. ही सभा आम्हाला मान्य नसून
शहरातील प्रलंबित प्रश्न व नागरिकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांवर चर्चा घडवुन ती सोडविण्यासाठी सदरच्या सभेतील विषय क्र. १ ते २६ हेच सर्व विषयाची
आजची सर्वसाधारण सभा आठ दिवसांनी पुन्हा घ्यावी, अशी मागणी या सेना भाजपाच्या २० नगरसेवकांनी लेखी पत्राव्दारे कोपरगांव नगरपरिषचे नगराध्यक्ष व मुख्यधिकारी यांच्याकेडे केली. परंतु सदरची मागणी नगराध्यक्ष व पालिका प्रशसनाने गांभीर्याने न घेता त्यास केराची टोपली दाखवुन सभेचे कामकाज पुढे चालु ठेवल्यामुळे भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांनी सदर सभेतील विषयाचे विषयान्वये अभिप्राय पत्राव्दारे देवुन त्याची नोंद सभेच्या इतिवृत्तामध्ये नोंद करण्याची मागणी केली. दिलेले सविस्तर अभिप्राय पुढीलप्रमाणे देत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गटनेते रविंद्र पाठक व शिवसेनेचे गटनेते नगरसेवक योगेश बागुल यांनी दिली.
विषय क्र. १ दिनांक २८ फेबु्रवारी २०२० रोजीच्या सभेचे इतिवृत्त नगरपरिषदेकडुन न मिळाल्याने ते प्राप्त झाल्यावर त्यावर मत प्रकट केले जाईल.
विषय २ आस्थापना विभागाकडुन स्वेच्छनिवृत्ती बाबात आलेल्या अर्जाचा विचार करता स्वेच्छानिवृत्ती देतांना सक्षम वैद्यकीय अधिका-याचा दाखला व त्यांच्या वयाचा विचार व्हावा.
विषय ३ व ४ मंजुर , विषय ५ नियमाप्रमाणे सर्वांना एक संधी देण्यात यावी.
विषय ६ कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव पाहता शहरातील मिळकतीचे तुर्त फेर मुल्यांनकन न करता त्यावर नंतर विचार विनियम करावा. व सन २०१९-२० ची शास्ती माफ करावी.
विषय ७ भविष्यात नगर मनमाड हायवे चारपदरी होणार असल्याने तदनंतरच सेंट्रल लाईन व स्ट्रीट लाईट, हायमास्ट बसविण्याचा विचार व्हावा व पालिकेचे आर्थीक नुकसान टाळावे याकरिता एक समिती नेमावी.
विषय ८ नामंजुर – जुन्या घंटागाडयावर किती मेनटनन्स खर्च झाला व ठेकेदारांकडुन भाडेपोटी किती रक्कम मिळाली कचरा संकलन करुन वाहतुकीसाठी घंटागाडी ठेकेदारानेच घ्यावेत व त्याचा मेनटनन्स ही त्यांनी करावा.
विषय ९ व १० मंजुर ,
विषय ११ गायत्री कन्स्ट्रक्शन यांनी सदर तलावाच्या जागेवरील अंदाजे १५ कोटी किंमतीचे माती व मुरुम समृध्दी रस्त्यासाठी मोफत उचली असतांना सदर तलावाचे बांधकामासंदर्भात गायत्री कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत चर्चा करावी. तसेच
साठवण तलाव क्र ५ च्या बांधकामाकरिता प्रकल्प सल्लागार नेंमण्याकरिता आपण निविदा प्रसिध्द केली होती त्यावर ४ निविदा पालिकेस प्राप्त झाल्या परंतु त्यावर कोणत्याही स्वरुपाची बैठकीत चर्चा झालेली नाही व सदरच्या निविदा नगरसेवकांच्या समोर आवश्यक असतांना ही तसे झालेले नाही. परस्पर मानवसेवा कन्सलटन्ट धुळे यांना तांत्रिक सल्लागार म्हणुन नेमणे योग्य होईल असे बांधकाम अभियांताने नमुद केले आहे. परंतु आम्ही घेतलेल्या माहितीनुसार त्यांचे काम असमाधानकार असल्याचे समजते त्यामुळे त्यांची नेमणुक करण्यात येवु नये पूर्वी ५ नंबर तलाव संदर्भात महराष्ट्र जीवन प्राधीकरण यांना तांत्रिक सल्लगार फि अदा केले त्याचे पुढे काय झाले ? त्यांनी तांत्रिक सल्लगार म्हणुन काम करण्यास असमर्थ असल्याचे आपणास कळविले आहेत का ? किंवा कसे ?. तलाव क्र. ५ चे बांधकाम हा विषय जनतेच्या जिव्हाळयाचा प्रश्न असल्याने त्यावर सविस्तर प्रत्यक्ष चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच त्याचे काम दर्जेदार होणे हे नागरिकांच्या हिताचे आहे या सर्व बाबींचा विचार करता तलाव क्र. ५ व ४९ कोटीचे पाणीपुरवठा योजना यावर सविस्तर विचार विनिमय करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष नगरपालिकेच्या सभागृहात सोशल डिस्टींगचे सर्व नियमपाळुन बोलविण्यात यावी.
विषय १२ मंजुर , विषय १३ नगरसेवकांना कामे सुचिवण्याकरिता वेळ देवुन त्यांच्याकडुन प्रत्येकाकडुन प्रभागातील कामांची लेखी यादी घेवुन प्रस्ताव तयार करावा.
विषय १४ नगरपालिका मालिकेचे खुले नाटयगृह हे फार जुने झाले असल्याने ते मोडकळीस आले आहे ते डिमाॅलिश करुन तेथे नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने व्यावसायिक स्वरुपाचे संकुल बांधावे.
विषय नंबर १५ ते विषय नंबर १७ मंजुर
विषय १८ सि.स. १६२० मधुन रस्ता जोडणे बाबत नियमानुसार कार्यवाही करावी.
विषय १९ येवला नगरपालिकेने बंदिस्त नाटयगृहासाठी ज्याप्रमाणे शासनाकडुन जागा मिळविली त्याप्रमाणे कोपरगांव नगरपालिकेस मंजुर झालेल्या बंदिस्त नाटयगृहासाठी नाममात्र दरात जागा उपलब्ध होवु शकेल सदरची कार्यवाही पालिकेने त्वरीत करावी अन्यथा उपलब्ध असलेला निधी परत जावु शकतो.
विषय २० व विषय २१ – स.न. २०५ व स.न. २१० या संदर्भात मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे पुर्नविचार याचीका दाखल करावी.
विषय २२ – सर्वे नंबर २१० मध्ये १२ मिटरचा रुंद डिपी रोड आहे. तो नगरपालिकेने खडीकरन करुन सुरळीत चालू करावा त्यानंतर सुरेश गिरमे यांचा अर्जाचा विचार करावा.
विषय २३ नामंजुर
विषय २४ कोर्ट केसचा जो निर्णय होईल त्यावर विचार विनिमय करणे.
विषय २५ व विषय २६ आॅनलाईन मिटींग चालु झाल्यावर अभिप्राय प्रकट केले जाईल.
अशा प्रकारचे विषय क्र १ ते विषय २६ बाबतचे अभिप्राय भाजप सेनेच्या नगरसेवकांनी लेखी पत्राव्दारे पालिकेत सादर केले आहे.