आज पर्यंत क्रिडा संकुल पळविल्याच्या बोंबा मारल्या, मग क्रिडांगणाचे आरक्षण उठविण्यासाठी आता जिवाचा आटापिटा का ? – पराग संधान
वृत्तवेध ऑनलाईन।Thu 17Sep2020
By:Rajendra Salkar, 14.20
कोपरगाव : थोडेथिडके नव्हे ६० कोटी रुपयांचा प्रश्न आहे. तेंव्हा पाच नंबर करा,आणखी सहा नंबर करा पण आधी चर्चा तर करा, कोण मानव सेवा कन्सल्टन्सी आहे. आधी त्याला उजेडात येऊ द्या, जिल्ह्यातील क्रीडा संकुलांची परिस्थिती पहा इकडे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगावचे क्रीडा संकुल जिवंत तरी ठेवले आहे त्याचा उपभोग नागरिकांना मिळत आहे क्रीडा संकुल पळविण्याच्या बोंबा मारत होतात ना मग आज किडांगणाचे आरक्षण उठविण्यासाठी जिवाचा आटापिटा का असा सवाल भाजपाचे प्रवक्ते पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
पराग संधान म्हणाले, कोरोना लॉकडाऊन काळातील इतर पालीकाप्रमाणे घरपट्टी माफ करा म्हटले तर यांची तयारी नाही उलट शास्ता कराच्या नावाखाली वार्षिक २४ टक्के दंड वसूल सुरू आहे. काम करून देतो म्हणणा-या गायत्री कंपनीने कोटयावधीचा माती मुरूम नेला त्याचे काय ? पाच नंबर तकेली व ४९ कोटीचे वॉटर ऑडिट हे दोन्ही विषय मोठे असून त्यासाठी स्पेशल सर्वसाधारण सभा घ्या, पहिल्या कन्सल्टिंग ला २३ लाख रुपये दिले त्यांचा अभिप्राय काय मग दुसऱ्या कन्सल्टींग कशी नेमता? श्रेयवादाच्या नादात स्मार्ट सिटी घालण्याचे पाप केले कोल्हे साहेबांनी किमान क्रीडासंकुल जिवंत ठेवले, आजही लोक याठिकाणी जात आहेत, तुम्ही तर थेट आरक्षण उठवण्यास निघाल, निवा-यात रस्ता बंद झाला लोकांची गैरसोय झाली त्याचे काय ? सभेत कोरोनाचा चकार शब्द नाही विषय नाही फक्त स्वतःचा वैयक्तिक इंटरेस्ट असलेले विषय घ्यायचे असा आरोप संधान यांनी केला मानव सेवा सल्लागाराला उजेडात येऊ द्या आमने-सामने चर्चा होऊ द्या, नगराध्यक्ष तुम्ही, मुख्याधिकारी तुमचा, आमदार तुमचा, सरकार तुमचे मग आरक्षण उठवता कशाला निधी आणा, एकाधिकारशाहीची मुजोरी का? अरेरावी का? बंदिस्त नाट्यगृहासाठी दोन कोटीचा निधी आला वर्ष झाले तो पडून आहे. ते सोडून जुन्या खुले नाट्यगृहाला ९० लाख रुपये खर्च करून दुरुस्त करण्याचा घाट कशासाठी ? केवळ श्रेयवादासाठीच ना ? पण एक लक्षात ठेवा तुमच्या श्रेय वादासाठी जनतेस वेठीस धरू नका अशा शब्दात त्यांनी सुनावले.
दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यावरच सहा कोटी कोटीच्या निधीचे कार्पेट अंथरून सहा कोटी वाया घालवू नका असे आवाहन करीत संधान यांनी क्रीडांगणासाठी नगरसेवक प्रत्येकी अकरा हजार रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. कोपरगाव शहराच्या विकासासाठी काळे यांनी पुढाकार घेतला तर आम्ही मंत्रालयात येऊ असेही संधान शेवटी म्हणाले,
आरक्षण उठवण्याचे पाप माथी येऊ नये
उपनगराध्यक्ष योगेश बागुल म्हणाले पोलीस परेड ग्राऊंड, क्रीडांगण व एस टी स्टॅन्ड यासाठी मोक्याची जागा असलेले आरक्षण या महत्त्वाच्या विषयाकडे जाणीव पुर्वक कानाडोळा केला ही खेदाची बाब आहे. हा मोठा प्रश्न दुर्लक्षित केला माहिती का लपवली ? प्रशासकीय पत्र दिले, खुलासा न करता विषय सभेत आणला एक तर या विषयाची सखोल माहिती नसल्याने व आरक्षण ऊठविणे घातक होते व ते पाप माथी येवू नये म्हणून आम्ही तो स्थगित केला.
४९ कोटीच्या पाणी योजनेसाठी मा.आ.
स्नेहलता कोल्हे यांनी अथक प्रयत्न केले. दुर्दैवाने योजना पूर्ण न होता ठरल्याप्रमाणे ट्रायल न घेता ९९.९० टक्के बिल अदा केले गेले. दिवसाआड पाणी हे निळवंडेचे वास्तव जनतेसमोर ठेवणार होते. अशी कैफियत बागुल यांनी मांडली.
संजय सातभाई म्हणाले, आमदार काळे यांनी निळवंडे च्या हातपाय का हलविले नाही ? श्रेय कोणाला यापेक्षा आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही म्हणाल तिथे जाऊ मुख्यमंत्र्यांचा आहे असेही ते म्हणाले ६० कोटीचा खर्च करून अवघे दहा ते बारा दिवसाचे पाणी वाढणार आहे त्याने प्रश्न सुटणार नाही निळवंडे चे फुकट मिळणाऱ्या पाण्यासाठी सुद्धा आमदारांनी प्रयत्न केला पाहिजे,
कैलास जाधव म्हणाले, आदित्य ठाकरे युतीच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे आले असता त्यांनी निळवंडेचे काम १०० टक्के मार्गी लावतो असा शब्द दिला होता त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. संभाजी महाराज पुतळा येथील कारंजा मोटार बंद पडलेली चोरिला गेली परंतु आजपर्यंत ती साधी मोटर सुद्धा यांना बसवता आली नाही दुर्दैवाची बाब आहे या रस्त्याचे सुशोभीकरण रिक्षा संघटनेकडे आहे त्याचे डिझाईन सुद्धा यांनी आजपर्यंत दिले नाही आरोपही त्यांनी केला निखाडे आणि सभापती स्वप्निल निखाडे म्हणाले पाणी समितीच्या बैठकीत ४९ कोटी पाणी योजनेचे वॉटर ऑडिट व्हावे हा विषय मंजूर करण्यात आला तो सर्वसाधारण सभेचे घ्यावा अशी मागणी केली होती परंतु कायद्याची पायमल्ली करून नगराध्यक्षांनी हेतुपुरस्सर तो विषय सर्वसाधारण सभेत घेतला नाही ही शुद्ध मनमानी आहे . अशी टीका निखाडे यांनी केली. गटनेते रवींद्र पाठक, राजेंद्र सोनावणे यांनी सुद्धा चर्चेत भाग घेतला.